ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. 24 - भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि चेक रिपब्लिकच्या बार्बोरा स्ट्रायकोव्हा जोडीनं अंतिम सामन्यात चीनच्या चेन लिआन्ग आणि झाऊशान यँग जोडीचा पराभव करत तोराय पॅन पॅसिफिक ओपनचं विजेतेपद मिळवलं. सानिया मिर्झा - बार्बोरा स्ट्रायकोव्हा जोडीने 6-1, 6-1 असा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. हा सामना जिंकण्यासाठी त्यांना फक्त 52 मिनिटे लागली. सानिया-बार्बोराचं हे दुसरंच विजेतपद ठरलं. यापूर्वी दोघींनी अमेरिकेतल्या सिनसिनाटी मास्टर्सचं जेतेपद मिळवलं होतं.