शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

सानिया मिर्झाची बहीण करणार क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 1:51 PM

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला आणि या दाम्पत्याला 30 ऑक्टोबरला पुत्रप्राप्ती झाली आणि दोघांनी त्याचे नाव इझान मिर्झा मलिक असे ठेवले. सानिया आणि शोएब हे दाम्पत्य नेहमी चर्चेत राहिले आहे. आता सानियाची बहीण अनम मिर्झा क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न करणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद आणि अनम यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा आहेत आणि ही दोघं लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. असद आणि अनम यांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. सानियाच्या त्यांच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

''येत्या डिसेंबर महिन्यात अनम लग्न करणार आहे. आम्ही नुकतेच पॅरीसमधून बॅचलर पार्टी करून परत आलो आहोत. तिच्या लग्नासाठी आम्ही सर्वच उत्सुक आहोत. ती मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा असदशी विवाह करणार आहे,'' असे सानियानं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पहिला पती अकबर रशीदकडून काडीमोड घेण्यासाठी अनमने गतवर्षी कोर्टात केस दाखल केली आहे. 18 नोव्हेंबर 2016 मध्ये तिचा आणि हैदराबादचा उद्योगपती अकबर यांचा विवाह झाला होता. 

विराट कोहलीच्या अपयशाला अनुष्का जबाबदार कशी? सानिया मिर्झा संतापलीभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अपयशाला नेटिझन्सकडून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्कालाच जबाबदार धरले जाते. नेटिझन्सच्या याच दृष्टीकोनावर टेनिसस्टार सानिया मिर्झा चांगलीच भडकली आहे. विराटच्या अपयशाला अनुष्काला जबाबदार धरणे, याला काहीच अर्थ नाही, असे सानिया म्हणाली.

India Economic Summit मध्ये ती म्हणाली की,''विराट कोहली शून्यावर बाद झाला, तर अनुष्का शर्मावर टीका होते. या गोष्टीचा एकमेकांशी काही संदर्भ आहे का? या टीकेमागे काहीच तर्क नाही. आपल्या भारतीय क्रिकेट संघासह दौऱ्यावर असताना अनेकदा त्यांच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड्सना सोबत नसतात. कारण, की खेळाडूंचे लक्ष विचलित होईल. यामागेही काय अर्थ आहे, हे कळले नाही. महिला पुरुषांचे लक्ष विचलित करतात, असे म्हणायचं आहे का?''  

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाShoaib Malikशोएब मलिक