कराची : भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक ही जोडी कायम चर्चेत असते. शोएब मलिक त्याच्या शांत स्वभावासाठी क्रिकेटमध्ये ओळखला जातो. मात्र सानिया मिर्झाला असे वाटत नाही.
एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सानियाने सांगितले की, ‘शोएब मलिक वाटतो तितका शांत नाही.’ या मुलाखतीत सानियाला ती खोटे बोलते का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने नाही असे उत्तर दिले. त्यानंतर लगेच सूत्रसंचालकाने हुशारीने विचारले की, शोएब मलिक स्वभावाने साधा आहे का? यावर सानियानेही दिलखुलास उत्तर देताना म्हटले की, ‘अजिबात नाही, तो वाटतो तितका साधा नाही.’