आॅस्ट्रेलियन ओपन : फेडरर, मरे, नदाल, शारापोव्हा तिसऱ्या फेरीत मेलबोर्न : भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा, लिएंडर पेस यांनी आपापल्या जोडीदारांसह दुहेरी लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून आॅस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला़ स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर, रशियाची मारिया शारापोव्हा, ब्रिटनचा अँडी मरे आणि स्पेनच्या राफेल नदाल यांनी एकेरी सामन्यात शानदार विजय मिळवीत स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत मजल मारली़स्पर्धेतील एकेरी सामन्यात स्टार टेनिसपटू फेडरर याने लौकिकास साजेसा खेळ करताना इटलीच्या सिमोन बोलेली याच्याविरुद्ध ३-६, ६-३, ६-२, ६-२ असा विजय मिळवीत आगेकूच केली़ फेडररसमोर पुढच्या फेरीत इटलीच्या आंद्रियास सेपी याचे आव्हान असेल़ माजी नंबर वन खेळाडू आणि स्पर्धेत तृतीय मानांकन प्राप्त स्पेनच्या राफेल नदाल याला विजय मिळविण्यासाठी अमेरिकेच्या टीम स्मीजॅक विरुद्ध बराच घाम गाळावा लागला़ तब्बल ४ तासांहून अधिक वेळ चाललेला हा सामना अखेर नदालने ६-२, ३-६, ६-७, ६-३, ७-५ अशा फरकाने जिंकून तिसरी फेरी गाठली़ या लढतीत पहिला सेट गमावल्यानंतर पुढचे दोन्ही सेट जिंकून स्मीजॅक याने नदालच्या तोंडचे पाणी पळविले होते़ मात्र, यानंतर नदालने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून सामन्यात बाजी मारली़ आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये तीन वेळा उपविजेता राहिलेल्या ब्रिटनच्या अँडी मरे याने आॅस्ट्रेलियाच्या मारिंको माटोसेविच याच्यावर सरळ सेटमध्ये ६-१, ६-३, ६-२ अशी मात करताना तिसरी फेरी गाठली़ पुढच्या फेरीत मरेला पोर्तुगालच्या जाओ सोसाचा मुकाबला कराव लागणार आहे़पुरुष गटातील दुसऱ्या फेरीच्या सामन्यांत बुल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्ह याने स्लोवाकियाच्या लुकास लैकोवर ६-३, ६-७, ६-३, ६-३ असा विजय मिळविला, तर झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बेर्डिच याने आॅस्ट्रियाच्या जर्गेन मेल्जरवर ७-६, ६-२, ६-२ अशी सरशी साधली़ अन्य लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन, फ्रान्सचा रिचर्ड गास्केट, बेल्जियमचा डेव्हिड गोफि न, अर्जेंटिनाचा लियांड्रो मेयर यांनी स्पर्धेत आगेकूच केली़ महिला गटातील सामन्यात रशियाच्या मारिया शारापोव्हाला आपल्याच देशाच्या अलेक्जांद्रा पेनोव्हा हिच्याविरुद्ध विजय मिळविण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली़ मारियाने या लढतीत अखेर ६-१, ४-६, ७-५ अशी बाजी मारलीच़अन्य लढतीत उदयोन्मुख खेळाडू कॅनडाच्या इयुगेनी बुचार्ड हिने नेदरलँडच्या किकी बर्टन्स हिचा ६-०, ६-३ असा पराभव केला, तर रशियाच्या एकतेरेना मकारोव्हा हिने इटलीच्या रॉर्टा विंची हिचा ६-२, ६-४ असा सहज पराभव करीत तिसरी फेरी गाठली़ चीनच्या पेंग शुहाई हिने स्लोवाकियाच्या मॅगडेलिना रिबारिकोव्हावर ६-१,-६-१ असा विजय मिळविला़ (वृत्तसंस्था)च्पुरुष गटातील दुहेरी लढतीत भारताच्या लिएंडर पेस याने दक्षिण आफ्रिकी जोडीदार रावेन क्लासेनसह अमेरिकेच्या स्कॉट लिपस्की आणि राजीव राम यांचा ६-४, ७-६ अशा फरकाने पराभव करताना दुसरी फेरी गाठली़ च्पेस आणि क्लासेन यांना दुसऱ्या फेरीत अमेरिकेचे स्टीव्ह जॉन्सन, सॅम क्वेरी आणि सिमोन बोलेली, फेबियो फोगनेनी (इटली) यांच्यात होणाऱ्या लढतीतील विजेत्या जोडीचा सामना करावा लागणार आहे़च्महिला गटातील दुहेरी लढतीत अनुभवी सानियाने चिनी तैपेईच्या सु वेई सीहच्या साथीने आक्रमक खेळ करताना, अर्जेंटिनाची मारिया इरिगोएन आणि स्वीत्झर्लंडची रोमिना ओपरेंडी या जोडीवर अवघ्या ४८ मिनिटांत ६-२, ६-० अशा फरकाने सहज विजय मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला़ च्सानिया आणि सीए या जोडीला दुसऱ्या फेरीच्या सामन्यांत आता कॅनडाची गॅब्रिएला दाबरोवस्की आणि पोलंडची एलिसिया रोसोलस्का यांचा सामना करावा लागणार आहे़
सानिया, पेस दुसऱ्या फेरीत
By admin | Published: January 22, 2015 12:16 AM