मियामी : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा व चेक प्रजासत्ताकची तिची सहकारी बारबरा स्ट्रायकोव्हा जोडीला मियामी ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम लढतीत बिगरमानांकित कॅनडाची गॅब्रियला डी व चीनची शू यिफान या जोडीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. तिसरे जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सानिया आणि स्ट्रायकोव्हा यांना एक तास रंगलेल्या लढतीत ४-६, ३-६ ने पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)सानिया आणि गॅब्रियला यांच्यात यापूर्वी एकही लढत झाली नाही, पण बीएनपी परिबस ओपनमध्ये या दोन्ही खेळाडू सोबत सराव करीत होत्या. अंतिम लढतीपूर्वी गॅब्रियला व यिफान यांनी आठव्या मानांकित एबिगेल स्पीयर्स व कॅटरिना सेबोत्निक यांचा पराभव केला होता. (वृत्तसंस्था)
सानिया-स्ट्रायकोव्हा अंतिम फेरीत पराभूत
By admin | Published: April 04, 2017 12:46 AM