एका बाजूला भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झालाय. दुसरीकडे टीम इंडियात भाव मिळत नसलेला स्टार विकेट किपर बॅटर फुटबॉलमधील एन्ट्रीमुळे चर्चेत आलाय. आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाची कॅप्टन्सी करणाऱ्या संजू सॅमसन याने एक मोठा निर्णय घेतला. क्रिकेटच्या पलिकडे जाऊन हा स्टार विकेट किपर बॅटर फुटबॉलशी कनेक्ट झाला आहे.
संजूची मालकी तोऱ्यात फुटबॉल क्षेत्रात एन्ट्री
आयपीएलमध्ये कुणाच्या तरी मालकीच्या संघाचे नेतृत्व करणारा संजू सॅमसन फुटबॉलच्या रिंगणात खेळणाऱ्या संघाचा सह मालक झाला आहे. केरळ फुटबॉल लीगमध्ये खेळणाऱ्या लोकप्रिय संघाशी कनेक्ट झाल्याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.
ऐतिहासिक विजयानंतर करण्यात आली संजू कनेक्ट झाल्याची घोषणा
संजू सॅमसन हा केरळ सुपर लीग (KSL) स्पर्धेत सहभागी असणाऱ्या मल्लपुरम एफसी संघाच्या सह मालकाच्या भूमिकेसाठी सज्ज झालाय. मलप्पुरम एफसीनं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर लगेच स्टार क्रिकेटर आपल्याशी जोडला गेल्याची माहिती शेअर केली आहे. या संघाने कोच्चीच्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर फोर्का कोच्चीवर २-१ असा विजय नोंदवला. मलप्पुरम एफसी संघ जिल्ह्यातील पय्यानाड स्टेडियमवर आपल्या घरचे सामने खेळतो. या स्टेडियवर ३० हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
KSL चा पहिला हंगाम, या लीगमध्ये किती संघांचा समावेश?
संजू सॅमसन ज्या फुटबॉल संघाचा सह मालक झाला आहे त्या ग्रुपमध्ये त्याच्या अन्य सहकाऱ्यांमध्ये व्हीए अजमल बिस्मी, डॉ. अन्वर अमीन चेलाट आणि बेबी नीलाम्बरा यांचा समावेश आहे. यावर्षी केरळ सुपर लीगचा अर्थात KSL चा पहिला हंगाम आहे. या लीगमध्ये सहा संघ सहभागी आहेत. ही स्पर्धा भारतीय फुटबॉलशी थेट कनेक्ट नाही. पण प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठी ही स्पर्धा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.