नवी दिल्ली : श्रेया अग्रवाल आणि पॅरा नेमबाज स्वरुप उनाहलकर यांनी १७व्या कुमार सुरेंद्र सिंग (केएसएस) स्मृती नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना आपापल्या गटात वैयक्तिक पदकाची कमाई केली.भारताच्या ज्युनिअर संघात समावेश असलेल्या श्रेयाने १० मीटर एअर रायफल गटात २४७.७ गुणांचा वेध घेताना मेहुली घोष सारख्या कसलेल्या खेळाडूला मागे टाकत सुवर्णपदकाचा वेध घेतला. यानंतर श्रेयाने ज्युनिअर गटातही आपली चमक दाखवताना २४९ गुणांचा वेध घेत रौप्य पदकावर नाव कोरले. विशेष म्हणजे, या वेळी तिने मेहुलीला मागे टाकत बाजी मारली.दुसरीकडे दिव्यांग गटामध्ये स्वरुपने १० मीटर एअर रायफल प्रकारामध्ये ६०.९.१ गुणांचा वेध घेत रौप्य पदक पटकावले. (वृत्तसंस्था)
श्रेया अग्रवालची चमकदार कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:23 AM