जेजू : येथे झालेल्या विश्व महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताच्या सरजूबाला देवी, आणि स्वीटी यांना प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागल़े
सरजूबाला हिला फायनल लढतीत जागतिक क्रमवारीत तिस:या स्थानावर असलेल्या आणि गत स्पर्धेत कांस्यपदकाची मानकरी ठरलेल्या कजाकिस्तानच्या नाजिम कइजाइबे हिच्याकडून 48 किलो वजन गटात पराभवाची नामुष्की ओढावली़
दुस:या अंतिम फेरीच्या सामन्यात भारताच्या स्वीटीला चीनच्या यांग शिओलीकडून मात खावी लागली़ त्यामुळे तिला रौप्यावर समाधान मानावे लागल़े स्वीटीने जोरदार खेळ करताना चीनच्या यांगवर दबाव निर्माण केला़ मात्र, यातून सावरताना यांगने भारतीय खेळाडूला बॅकफूटवर ढकलल़े यांगने आपल्या लांब हातांचा पुरेपूर लाभ घेताना दुस:या फेरीतही आपले वर्चस्व राखल़े यानंतर तिस:या आणि चौथ्या फेरीत स्वीटीने आपल्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, तिला चिनी खेळाडूंचा डिफेन्स भेदता आला नाही़ अशा प्रकारे यांगने गोल्डवर ताबा मिळविला़
फायनल लढतीत सरजूबालाने आक्रमक खेळ करताना पहिल्या फेरीत सहज सरशी साधली़ मात्र, त्यानंतर दुस:या फेरीत कजाकिस्तानच्या खेळाडूंनी जोरदार मुसंडी मारताना दुसरी फेरी जिंकू न सामन्यात बरोबरी साधली़
तिस:या फेरीत सरजूबालाला कामगिरीत सातत्य राखता आले नाही़ त्यामुळे या फेरीत तिला मात खावी लागली़ चौथ्या आणि निर्णायक फेरीत दोन्ही खेळाडूंत चांगलीच झुंज रंगली़ मात्र, अखेर या फेरीत भारतीय खेळाडूवर कजाकिस्तानच्या नाजिमने वर्चस्व राखताना सुवर्णपदकावर नाव कोरल़े (वृत्तसंस्था)