नवी दिल्ली : भारतात यापूर्वी झालेल्या विश्व चॅम्पियनशिपची सुवर्णपदक विजेता सरिता देवी (६० किलो) आणि फॉर्मात असलेली भारतीय बँथमवेट बॉक्सर मनीषा मौनने (५४ किलो) शुक्रवारी येथे केडी जाधव सभागृहात शानदार विजय नोंदवत एआयबीए महिला विश्व चॅम्पियनशिपच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
सरिताने दुसऱ्या फेरीत स्वित्झर्लंडच्या डायना सांड्रा ब्रुगरचा ४-० ने पराभव करीत आगेकूच केली. पुढच्या फेरीत सरिताला १८ नोव्हेंबर रोजी आयर्लंडच्या एने हॅरिंगटनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. हॅरिंगटनने न्यूझीलंडच्या ट्राय गार्टनचा पराभव केला. मनीषाने पहिल्या फेरीत अमेरिकेची अनुभवी व २०१६ विश्व स्पर्धेतील कांस्यपदक विजेती क्रिस्टिना क्रुजचा ५-० ने शानदार विजय नोंदवत प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. मनीषाला आता उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी १८ नोव्हेंबरला कजाकस्तानच्या डिना जोलामॅनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जोलामॅनने मिजुकी हिरुताचा ४-१ ने पराभव केला.
ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेती पिंकी रानीला (५१) पहिल्या फेरीत शनिवारी अर्मेनियाच्या ग्रिगोरयानसोबत लढत द्यावी लागेल. सोनिया (५७) शनिवारी मोरक्कोच्या डोआ टोयुजानीविरुद्ध खेळेल. लाईट वेल्टरवेट (६४ किलो) गटात सिमरनजित कौरला उपउपांत्यपूर्व फेरीसाठी अमेरिकेच्या अमेलिया मूरविरुद्ध लढावे लागेल.युवा मनीषासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. कारण तिला पहिल्याच फेरीत विश्व चॅम्पियनशिप पदकविजेत्या क्रिस्टिनाविरुद्ध खेळावे लागले. उपउपांत्यपूर्व फेरीत तिला यापेक्षा मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. तिची लढत २०१६ च्या विश्व चॅम्पियन खेळाडूविरुद्ध होईल. मनीषाने प्रशिक्षकांच्या रणनीतीनुसार सुरुवातीला क्रिस्टीनाचा खेळ समजण्यावर भर दिला. (वृत्तसंस्था)पुढची लढत आव्हानात्मकच्विजयानंतर प्रतिक्रिया देताना मनिषा म्हणाली, ‘पहिल्या फेरीचा अडथळा पार करण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला. पुढच्या फेरीची लढत माझ्यासाठी अधिक आव्हानात्मक आहे. कारण प्रतिस्पर्धी विश्वचॅम्पियन राहिलेली आहे. मी या आव्हानासाठी सज्ज आहे.’च्सरिताने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. सरिता म्हणाली,‘माझी प्रतिस्पर्धीही अनुभवी होती. मी पहिल्या फेरीत सावधगिरी बाळगली, पण दुसºया व तिसºया फेरीत अपर गार्डने जोरदार प्रत्युत्तर दिले. स्थानिक प्रेक्षकांपुढे खेळताना दडपणही असते, पण त्यामुळे प्रेरणाही मिळते.’