शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

सरिता, पिंकीचे पुनरागमन

By admin | Published: May 29, 2017 12:27 AM

व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सहभाग घेतल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा कमी वेळेत माजी वर्ल्डचॅम्पियन एल. सरितादेवी आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कास्यपदक

नवी दिल्ली : व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सहभाग घेतल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा कमी वेळेत माजी वर्ल्डचॅम्पियन एल. सरितादेवी आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कास्यपदक जिंकणाऱ्या पिंकी जांगडा यांनी राष्ट्रीय महासंघाची माफी मागताना अमॅच्युर बॉक्सिंगमध्ये पुनरागमन केले आहे.भारतीय बॉक्सिंग परिषदेशी (आयबीसी) करार करणाऱ्या या दोन्ही महिला मुष्टीयोद्ध्यांनी भारतीय बॉक्सिंग महासंघाला (बीएफआय) माफी पत्र सोपवले असून त्या पुन्हा राष्ट्रीय शिबिरात सहभागी होणार आहेत.बीएफआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले, ‘‘पिंकी उद्यापासून शिबिरात सहभागी होणार आहे, तर काही वैयक्तिक मुद्दे सुटल्यानंतर सरितादेखील लवकरच शिबिरात सहभागी होईल. या दोन्ही खेळाडूंनी माफी मागितली आहे. सरिताने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये जाताना आमच्याशी सल्लामसलत केली नव्हती, तर पिंकीने परवानगी न घेता शिबीर सोडले होते.’’ सरिताने २९ जानेवारीला आपली प्रारंभीची व्यावसयिक लढत जिंकल्यानंतर एकही लढत खेळली नाही आणि सध्या ती मुंबई येथे तिच्या आईजवळ आहे. पुढील काही दिवसांत ती शिबिरात सहभागी होईल.सरिताजवळील सूत्रांनी सांगितले, ‘‘सरिता आपल्या आईच्या आरोग्याविषयी व्यस्त आहे व ती लवकरच शिबिरात सहभागी होईल. तिने बीएफआयचे अध्यक्ष अजयसिंह यांच्याशीही चर्चा केली असून, चर्चेनंतर त्यांनी तिचे खूप समर्थन केले.’’ (वृत्तसंस्था)व्यावसायिक सर्किटमध्ये सहभागी झाल्यानंतर हौशी गटात पुनरागमन करण्यासाठी मी उत्सुक आहे. मी व्यावसायिक सर्किटमध्ये हात अजमावू इच्छित होते जे की मे केले. हे माझ्या मजबुती आणि ताकदीत वाढ होण्यासाठी होते. याशिवाय आपल्या पदार्पण लढतीनंतर आपण एकही लढत खेळलो नाही. त्यामुळे मी महासंघाला मला पुन्हा वापस घेण्यास आग्रह केला आणि ते सहमत झाले. परवानगी न घेता शिबीर सोडल्याबद्दल मी बीएफआयची माफी मागितली आहे. - पिंकी जांगडा, बॉक्सर