नवी दिल्ली- राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. सतीश शिवलिंगमने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. पुरूषांच्या 77 किलो वजनी गटात सतीश शिवलिंगमनेही सुवर्ण कामगिरी केली आहे. 317 किलो वजन उचलत सतीशने सुवर्णपदक आपल्या नावे केलं.
सतीश क्लिन अॅण्ड जर्कमध्ये 173 किलो वजन उचलण्याच यशस्वी ठरला. त्यानंतर त्याने 317 किलो वजन उचलण्याची कामगिरी करत पहिला क्रमांक मिळविला. शिवलिंगम स्नॅच राऊंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. सतीशने पहिल्या प्रयत्नात 136 किलो वजन उचललं. तर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 140 किलो वजन उचललं. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने 144 किलो वजन उचललं.
दरम्यान, याआधी दुसऱ्या दिवशी झालेल्या खेळात वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दोन पदकं मिळाली. संजिता चानूने सुवर्ण पटकावलं. तर पुरूष गटात वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या दीपक लाथरने सुवर्णपदकाची कमाई केली. आत्तापर्यंत वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला पाच पदकं मिळाली आहेत. गुरूवारी गोल्ड कोस्ट खेळाच्या पहिल्या दिवशी मीराबाई चानूने महिला 48 किलो वजनीगटात भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. तर गुरूराजने पुरूष 56 किलो वजनीगटात रौप्यपदक जिंकलं.