क्वालालम्पूर : दहशतवादी कृत्यांना चिथावणी देणाऱ्या गटांना पाठिंबा देत असल्याचा आरोप असलेल्या कतारवर अनेक आखाती देशांनी बहिष्कार घातल्याने वाद विकोपाला गेला आहे.याचा फटका क्रीडा क्षेत्रालादेखील बसला असून इराणमधील पर्सेपोलिस क्लब आणि सौदी अरबच्या अल अहली क्लबने कतारमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व लढतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, बहरिन, इजिप्त आणि येमेन यांनी कतारसोबतचे संबंध मोडीत काढले. या वादामुळे कतारच्या विमानांना या देशाच्या हवाईहद्दीतून प्रवेशास मज्जाव करण्यात आला. याचा अर्थ असा की आॅगस्टमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी या दोन्ही संघांना नव्या स्थळांचा शोध घ्यावा लागेल. (वृत्तसंस्था)एएफसी महासचिव विंडस्न जॉन म्हणाले, ‘इराणने ओमानला तटस्थ स्थळ म्हणून पसंती दर्शविली. सौदी अरबने कतारला पसंती दर्शविली होती. पण नव्या घटनाक्रमामुळे सौदी अरब देखील नवे तटस्थ स्थळ शोधणार आहे. (वृत्तसंस्था)
एएफसी चॅम्पियन्स लीगमधून सौदी अरब, इराण क्लबची माघार
By admin | Published: June 07, 2017 12:39 AM