नवी दिल्ली : भारताचा १६ वर्षीय युवा नेमबाज सौरभ चौधरीने अनेक दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत रविवारी येथे आयएसएसएफ विश्वकपमध्ये नवा विश्वविक्रम नोंदवताना सुवर्णपदक पटकावले. यासह त्याने भारतातर्फे टोकिओ आॅलिम्पिकसाठी तिसरे कोटा स्थान निश्चित केले. दुसरीकडे मनू भाकरची कामगिरी मात्र निराशाजनक ठरली. प्रथमच विश्वकप स्पर्धेत सहभागी होत असलेल्या चौधरीने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत कुठल्याही अडचणीविना अव्वल स्थान पटकावले. पात्रता फेरीत अव्वल स्थानावर राहिलेल्या मनूला चांगल्या सुरुवातीनंतरही महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
आशियाई क्रीडा व युथ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या चौधरीने एकूण २४५ गुणांची कमाई केली. सर्बियाचा दामी मिकेच २३९.३ गुणांसह दुसºया स्थानी राहिला, तर कांस्यपदक चीनच्या वेई पांगने मिळवले. त्याने २१५.२ अंक मिळवले. सौरभने आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीत वर्चस्व राखले आणि रौप्यपदक विजेत्या खेळाडूच्या तुलनेत ५.७ गुणांची आघाडीवर राहिला. त्याने अखेरच्या शॉटपूर्वीच सुवर्णपदक निश्चित केले होते. चांगल्या सुरुवातीनंतरही सौरभ पहिल्या फेरीनंतर सर्बियन नेमबाजसह बरोबरीत होता. दुसºया फेरीतही या चॅम्पियन नेमबाजाने लय कायम राखत अव्वल स्थान पटकावले.अन्य भारतीयामध्ये अभिषेक वर्मा व रविंदर सिंग यांना फायनलसाठी पात्रता मिळवता आली नाही. दोघांनी पात्रता फेरीत ५७६ असे समान गुण नोंदवले.
सौरभने १० पेक्षा अधिक गुणांचे १९ स्कोअर केले. त्याच्या नावावर १० मीटर एअर पिस्तुल कनिष्ठ गटातही विक्रमाची नोंद आहे. त्यात त्याने वरिष्ठ विश्वविक्रमापेक्षा अधिक गुणांची नोंद केली होती. चौधरीने गेल्या वर्षी जर्मनीमध्ये ज्युनिअर विश्वकप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. या व्यतिरिक्त तो कनिष्ठ विश्वविजेता व युवा आॅलिम्पिक चॅम्पियन आहे. पात्रता फेरीत चौधरी ५८७ गुणांसह तिसºया स्थानी होता. दक्षिण कोरियाच्या ली डेमयुंगने ५८८ व वेई पांगने ५८७ गुण नोंदवले होते. (वृत्तसंस्था)राष्ट्रकुल व युथ आॅलिम्पिकची सुवर्णपदक विजेत्या मनूने केवळ २२ गुणांची नोंद केली. तिने पहिल्या फेरीत पाचपैकी तीन गुण नोंदवले. त्यानंतरही तिला कामगिरीमध्ये सुधारणा करता आली नाही व तिची सातव्या स्थानी घसरण झाली. मनूने ५९० गुणांसह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती तर राही सरनोबत व चिंकी यादव यांना पात्रता मिळवण्यात अपयश आले.पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारतीय नेमबाजांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. या स्पर्धेत हंगेरीच्या इस्तवान पेनीने सुवर्णपदक पटकावले. भारताचा पारुल कुमार पात्रता फेरीत ११७० गुणांसह २२ व्या तर संजीप राजपूत ११६९ गुणांसह २५ व्या स्थानी राहिला. चौधरीने भारताला स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.