शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

सौराष्ट्राच्या खेळाडूंनी छाप सोडली

By admin | Published: March 21, 2017 1:03 AM

ही खेळपट्टी अखेरपर्यंत कळलीच नसल्याची प्रचिती आली. खेळपट्टीने प्रत्येकाचे अंदाज फोल ठरविले. खेळाची रंगत वाढविणाऱ्या दर्जाची खेळपट्टी

ही खेळपट्टी अखेरपर्यंत कळलीच नसल्याची प्रचिती आली. खेळपट्टीने प्रत्येकाचे अंदाज फोल ठरविले. खेळाची रंगत वाढविणाऱ्या दर्जाची खेळपट्टी निर्माण करता आली नसली, तरी क्युरेटर व मैदानावरील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आज सायंकाळी हसू फुलणार असल्याचे स्पष्ट आहे. स्मिथ आणि मॅक्सवेल, पुजारा आणि साहा यांनी आपल्या फलंदाजीची छाप सोडली. यष्टिरक्षक फलंदाजाचा सुरू असलेल्या शोधासाठी उपयुक्त पर्याय ठरू शकत असल्याचे साहाने सिद्ध केले आहे. मॅक्सवेलची प्रशंसा होत असली, तरी त्याला अद्याप दर्जा सिद्ध करायचा आहे. पुजाराने द्विशतकी खेळीने छाप सोडली. पुजारा परंपरागत कसोटी क्रिकेटच्या मुशीतील आहे. आॅस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव लवकर गुंडाळला असता, तर यजमान संघाला या खेळपट्टीवर चौथ्या डावात फलंदाजी करावी लागली असती. त्यामुळे पुजाराची खेळी महत्त्वाची ठरते. पुजाराने आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला असता, तर कदाचित भारताचा डाव लवकर संपुष्टात येण्याची शक्यता होती. रणजी स्पर्धेत सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणारे जडेजा व पुजारा यांनी या लढतीत वर्चस्व गाजवले. उजव्या हाताने मारा करणारे दोन वेगवान गोलंदाज आणि चार डावखुऱ्या फलंदाजांची आॅस्ट्रेलिया संघाने केलेली निवड जडेजासाठी लाभदायक ठरण्याची आशा होती. खेळपट्टीवर गोलंदाजांचे फूटमार्क नसताना जडेजाने पहिल्या डावात गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली. जडेजाच्या तुलनेत आश्विनची कामगिरी निराशाजनक ठरली. जडेजाने चमकदार कामगिरी करीत कुठल्याही खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले. मुळात क्रिकेट हा खेळच खडतर आहे आणि त्यात भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटची रंगत वेगळीच असते. यंदाच्या प्रदीर्घ क्रिकेट मोसमाचा शेवट धरमशाला येथे उभय संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्याने होणार आहे. (पीएमजी)