शालेय टेटे
By admin | Published: August 25, 2015 10:46 PM
सोमलवार, भवन्स स्कूलला विजेतेपद
सोमलवार, भवन्स स्कूलला विजेतेपदआंतरशालेय फुटबॉल स्पर्धानागपूर : नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांमध्ये सोमलवार निकालस स्कूल अणि मुलींमध्ये सिव्हिल लाईन्स येथील भवन्स स्कूलने बाजी मारली. विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. मुलांच्या अंतिम सामन्यात सोमलवार निकालस स्कूलने सिव्हिल लाईन्स येथील भवन्स स्कूलला ३-१ ने पराभूत केले. चारुदत्त चव्हाणने अक्षत देशमुखला १३-११, १३-११, ८-११, ११-३ ने आणि अंशुमन नाईकने संकेत गांधीला ११-९, ११-७, ६-११, ६-११ ने पराभूत केले. तिसऱ्या लढतीत सोमलवार निकालसच्या पीयूष लुलेला पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या लढतीत अंशुमन नाईकने अक्षत देशमुखला ११-३, ११-५, ११-७ ने पराभूत करून संघाला विजय मिळवून दिला. मुलींच्या चुरशीच्या अंतिम लढतीत सिव्हिल लाईन्स येथील भवन्स स्कूलने समर्थनगर येथील आर.एस. मुंडले स्कूलला ३-२ ने पराभूत केले. अरु वैष्णवने एम. विद्याला ११-०, ११-६, ११-२ ने नमविले. मुंडले स्कूलच्या वेदश्री रानडेने संस्कृती सरकारला ११-९, ११-१, ११-९ ने आणि आर्या मुजुमदारने शिग्धा चौधरीला ६-११, ११-८, ६-११, १२-१०, ११-८ ने पराभूत करून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भवन्स स्कूलच्या अरु वैष्णवने वेदश्री रानडेला ८-११, ११-५, ११-८, १४-१२ ने पराभूत करीत २-२ अशी बरोबरी केली. निर्णायक लढतीत भवन्स स्कूलच्या संस्कृती सरकारने एम. विद्याला ११-६, ११-८, ८-११, ११-९ ने पराभूत करीत जेतेपदाचा मान मिळवून दिला. (क्रीडा प्रतिनिधी)