ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - आयपीएलचे दहावे सत्र रंगतदार होताना दिसत आहे. आज झालेल्या दोन्ही सामन्यात हॅटट्रीक झाली आहे. बंगळुरुकडून सॅम्युअल्स बद्रीने तर गुजरातकडून अॅण्ड्रय़ू टायने हॅटट्रीक नोंदवली आहे.मुंबई आणि आरसीबीमध्ये बंगळुरुत झालेल्या सामन्यात आयपीएलची पहिली हॅटट्रीक झाली. वेस्ट इंडिजच्या सॅम्युअल्स बद्रीने मुंबई इंडियन्सच्या तीन फलंदाजांना माघारी धाडत हॅटट्रिक नोंदवली. तर आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात अॅण्ड्रय़ू टायने पुण्याच्या तीन फंलदाजाला माघारी झाडत दुसरी हॅटट्रीक नोंदवली. गुजरात विरुद्ध पुणे संघात सुरु असलेल्या सामन्यात 20 व्या षटकात अॅण्ड्रय़ू टायने 20 व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर अंकित शर्मा, मनोज तिवारी आणि ठाकूर यांना बाद केले. अॅण्ड्रय़ू टायने चार षटकात 17 धावांच्या मोबदल्यात पाच बळी मिळवले. गुजरात संघाला विजयासाठी निर्धारित 20 षटकात 172 धावांची आवश्कता आहे. आयपीएलचे दहावे सत्र रंगतदार अवस्थेकडे झुकताना दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या बद्रीने तिसऱ्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर पार्थिव पटेल (3), मॅग्लेघन (0) आणि कर्णधार रोहित शर्मा (0) यांना माघारी धाडून मुंबईला जोरदार हादरे दिले. बद्रीने 4 षटकांत केवळ 9 धावा देत 4 विकेट घेतल्या. पण बंगळुरुने मुंबईला विजयासाठी दिलेले 143 धावांचे आव्हान कायरन पोलार्ड आणि नितीश राणाच्या पलंदाजीच्या जोरावर पार केलं.
या भारतीय गोलंदाजांनी आयपीएलमध्ये केली आहे हॅटट्रीक - अक्षर पटेल(2016), प्रविण तांबे (2014), अमित मिश्रा (2013, 2011, 2008), अजित चंडेला (2012), प्रविण कुमार(2010), युवराज सिंग(2009 मध्ये दोन वेळा हॅटट्रीक केली आहे), रोहित शर्मा(2009) आणि लक्ष्मीपती बालाजी (2008)
आयपीएलच्या कोणत्या सत्रात किती हॅटट्रीकची झाली आहे नोंद -
आयपीएलच्या पहिल्या, दुसऱ्या सत्रात तीन हॅटट्रीक झाल्या होत्या.
तिसऱ्या चौथ्या पाचव्या आणि नवव्या सत्रात एका हॅटट्रीकची नोंद झालेली आहे.