Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमधून नुकतीच परतलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कोर्टात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा दिल्ली पोलिसांनी काढून घेतल्याचा दावा विनेशने केला आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी विनेश फोगटचे आरोप फेटाळून लावले आहेत.
विनेश फोगटच्या आरोपांवर दिल्ली पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आहे.पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा काढून घेण्याचा कोणताही आदेश नाही. सुरक्षा जवान येण्यास विलंब झाला असेल तर त्याची चौकशी करण्यात येत आहे.
गांगुलीच्या लेकीची न्यायासाठी 'दादा'गिरी! अत्याचाराच्या घटनेनं संताप; म्हणाली, "काहीही झालं तरी..."
विनेश फोगट व्यतिरिक्त ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकसह इतर अनेक कुस्तीपटूंनी गेल्या वर्षी भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. याबाबत जंतरमंतरवर अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू होते. अलीकडेच दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत.
लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता, मात्र नंतर स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या वादात भाजपने लोकसभा निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह यांचे तिकीट रद्द करून त्यांचा मुलगा करण भूषण यांना कैसरगंजमधून उमेदवारी दिली होती.
पॅरिस ऑलिम्पिकमधून जास्तीच्या वजनामुळे बाहेर
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट चमकदार कामगिरी केली होती. तिने अंतिम फेरीपर्यंतचा टप्पा पूर्ण केला होता. अंतिम स्पर्धेपूर्वी, तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले, त्यानंतर तिला अपात्र ठरवण्यात आले.