शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

सेहवाग व गंभीर यांनी केली जेटलीची पाठराखण

By admin | Published: December 21, 2015 12:02 AM

भ्रष्टाचाराच्या आरोपाला सामोरे जात असलेले डीडीसीएचे माजी अध्यक्ष अरुण जेटली यांना राज्यातील दोन स्टार क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांचे समर्थन मिळाले आहे.

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या आरोपाला सामोरे जात असलेले डीडीसीएचे माजी अध्यक्ष अरुण जेटली यांना राज्यातील दोन स्टार क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांचे समर्थन मिळाले आहे. २०१३ पर्यंत १३ वर्षे डीडीसीएचे अध्यक्षपद भूषवणारे केंद्रीय मंत्री जेटली यांच्या दिल्ली सरकारने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीसाठी जेटली यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, अशी दिल्ली सरकारने मागणी केली आहे. गंभीर व सेहवाग यांनी मात्र जेटली यांची पाठराखण केली आहे. गंभीरने टिष्ट्वट केले की,‘डीडीसीएतील भ्रष्टाचारासाठी अरुण जेटली यांना दोषी ठरवणे चुकीचे आहे. कराचा पैसा न वापरता दिल्लीसाठी उपयुक्त स्टेडियम निर्माण करणे केवळ जेटलीमुळे शक्य झाले. डीडीसीएमध्ये जे काही चुकीचे घडत आहे त्यासाठी माजी खेळाडू अरुण जेटली यांनी जबाबदार ठरवत असल्याचे बघून वाईट वाटते. आरोप करणाऱ्या माजी खेळाडूंना केवळ जेटली यांच्यामुळेत त्यांना डीडीसीएमध्ये मोठे पद भूषविता आले आहे. ’यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या सेहवागने राजकीय वक्तव्य करण्याचे टाळले, पण त्याने टिष्ट्वट करताना खेळाडूंच्या मदतीसाठी जेटली यांच्या भूमिकेची प्रशंसा केली. यंदाच्या रणजी मोसमात दिल्लीऐवजी हरियाणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेहवागने टिष्ट्वट केले की,‘डीडीसीएसोबत जुळलेला असताना जर मला एखाद्या खेळाडूच्या आश्चर्यजनक निवडीबाबत माहिती मिळाली, तर मला केवळ जेटली यांना सूचना करावी लागत होती. ते लगेच त्याची दखल घेत होते.’गंभीरने पत्रकार परिषदेत जेटली यांची पाठराखण केली. गंभीर म्हणाला, ‘जेटली यांच्या कार्यकाळात दिल्ली क्रिकेटसाठी चांगले कार्य झाले, पण त्यांनी पद सोडल्यानंतर गेल्या दोन वर्षांत येथील परिस्थिती बिघडली. जेटली यांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधल्या गेले. सुरुवातील कोटला कसे स्टेडियम होते, याची तुम्हाला चांगली कल्पना आहे. आता कोटला कसे स्टेडियम आहे, हे दिसतेच आहे. हे सर्व जेटली यांच्या अध्यक्षपदाखाली शक्य झाले. आज जेटलीवर टीका करीत असलेले लोक क्रिके ट सुधार समितीचे सदस्य होते. गंभीर पुढे म्हणाला,‘भ्रष्टाचार झाला किंवा नाही, याची मला माहिती नाही, पण माझ्या मते सध्या जे पदाधिकारी आहेत ते डीडीसीएमध्ये असायला नको. त्यांनी कधीच क्रिकेटच्या हिताचा विचार केलेला नाही. यापूर्वीची परिस्थिती चांगली होती. ’ गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि अन्य काही सीनिअर खेळाडूंना दिल्ली अ‍ॅण्ड जिल्हा क्रिकेट संघटनेच्या समितीवर नाराजी व्यक्त करताना २००९ मध्ये विरोध दर्शवला होता. (वृत्तसंस्था)योग्य खेळाडूला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी जेटली झटत होते. डीडीसीएतील काही अन्य पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणे वाईट स्वप्नाप्रमाणे होते, पण अरुण जेटली अडचणीच्या वेळी नेहमी खेळाडूंसाठी उपलब्ध असायचे.- वीरेंद्र सेहवागआमचा विरोध जेटली यांना नव्हता तर डीसीसीएतील अन्य पदाधिकाऱ्यांना होता. आम्ही कधीच त्यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. आम्हाला अडचण भासली, तर आम्ही जेटली यांच्याकडे धाव घेत होतो आणि ते तोडगा काढत होते. माझे व सेहवागचे जेटली यांच्यासोबत नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत.- गौतम गंभीर