शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लवकर संघ निवडा

By admin | Published: May 05, 2017 1:00 AM

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवड करण्यास हेतुपुरस्सर विलंब करीत असलेल्या बीसीसीआयची कानउघाडणी करीत प्रशासकांच्या

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवड करण्यास हेतुपुरस्सर विलंब करीत असलेल्या बीसीसीआयची कानउघाडणी करीत प्रशासकांच्या समितीने (सीओए) लवकरात लवकर संघ निवड करण्याचे निर्देश दिले आहेत. सीओएने यासंदर्भात बीसीसीआयला आधीही सूचना केली होती. आज संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांना पाठविण्यात आलेल्या सात सूचनांच्या पत्रात कठोर शब्दांत कान उपटण्यात आले. आयसीसीच्या नव्या आर्थिक मॉडेलमध्ये मोठा वाटा मिळावा यासाठी दबावतंत्राचा वापर म्हणून जगातील सर्वांत श्रीमंत मानल्या जणाऱ्या बीसीसीआयने संघ पाठविण्याची २५ एप्रिलची ‘डेडलाइन’देखील पाळली नव्हती. आयसीसीने बीसीसीआयचा वाटा ५७ लाख डॉलरवरून कमी करून २९.३ लाख डॉलरवर आणला आहे.सीओएने सर्व पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये संघ निवड टाळल्यामुळे बीसीसीआयची प्रतिमा नकारात्मक होत असल्याचे सूचित केले. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा संघ पाठविण्याची अखेरची तारीख २५ एप्रिल होती, पण संघाची अद्याप निवड झाली नाही, हे आपणा सर्वांना माहिती आहे. निवड समितीची त्वरित बैठक बोलवून संघ निवडा. नंतर यादी आयसीसीला सोपविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. भारतीय संघ जगात सर्वोत्कृष्ट आहे, हे लक्षात असू द्या. स्पर्धेतून माघार घेण्याआधी याचा विचार करा. बीसीसीआयची प्रतिमा नकारात्मक होऊ देण्याऐवजी टीम इंडियाच्या भल्यासाठी काम करा. खेळाडूंचे हित सर्वतोपरी असल्याचे भान ठेवा, असेही सीओएने पत्रात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)टीम इंडियासाठी नवे टी-शर्ट!मुंबई : टीम इंडियासाठी नवे टी-शर्ट तयार झाले आहेत. या टी-शर्टचा शुभारंभ बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांनी गुरुवारी केला. या टी-शर्टवर चीनची मोबाईल कंपनी असलेल्या ‘ओपो’चे नाव आहे. जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान भारतीय खेळाडू नवे टी-शर्ट घालणार आहेत. बीसीसीआयने एका उद्योग समुहाबरोबर १.०९७ कोटी रुपयांचा ५ वर्षांसाठी १ एप्रिलपासून करार केला.