मुंबई : दिलीप दांडेकर, सचिन खन्ना, अशोक मोहन अडवाणी, अनुप पटेल, कमलेश गुप्ता, अजित परमार या मुंबईकरांची मसिर्डिज गोल्फ चषकाच्या राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. ही फेरी पुणे येथे पार पडणार आहे. महालक्ष्मी येथील विलिंगटन स्पोर्ट्स क्लबमध्ये स्पर्धेची रंगत पार पडली. स्पर्धेचे यंदा १६ वे वर्ष होते.बुधवारी स्पर्धेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी सचिन (हॅन्डीकॅप १२) आणि अशोक (हॅन्डीकॅप २४) आपआपल्या गटात दमदार कामगिरी करत अनुक्रमे ६४ आणि ६३.४ गुणांसह राष्ट्रीय अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. स्पर्धेचा दुसरा दिवस अनुप (हॅन्डीकॅप ७), कमलेश (हॅन्डीकॅप २४) यांनी गाजवला. अनुपने ६३.४ आणि कमलेश ने ६१.८ अशी गुणसंख्या नोंदवत स्पर्धेत बाजी मारली. शेवटच्या दिवशी अजितने (हॅन्डीकॅप १५) ६३.२ आणि दिलीपने (हॅन्डीकॅप १९) ६४ गुणांसह राष्ट्रीय अंतिम फेरीचे तिकिट मिळवले.या स्पर्धेत मुंबईतून २५० स्पर्धेकांनी सहभाग घेतला. स्पर्धेची पात्रता फेरी १३ विविध शहरात पार पडणार असून मुंबईतील स्पर्धा दणक्यात झाली. स्पर्धेची राष्ट्रीय अंतिम फेरी पुणे आणि आंतरराष्ट्रीय अंतिम फेरी जर्मनी येथे होईल. या स्पर्धेसाठी देशभरातील २५०० गोल्फ खेळाडूंनी सहभाग घेतला असून बंगळूर, कोईम्बतूर, पुणे, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, हैद्रराबाद, जयपुर, जमशेदपुर, भुवनेश्वर, चंडीगढ आणि दिल्ली येथे स्पर्धेची पात्रता फेरी खेळवले जातील. (क्रीडा प्रतिनिधी)
राष्ट्रीय गोल्फसाठी ६ मुंबईकरांची निवड
By admin | Published: January 09, 2016 3:16 AM