सुनील गावस्कर लिहितात...
आ यपीएल संघ घरच्या मैदानावर ‘दादा’ असतात. घरी झालेला पराभव लाजिरवाणा असतो. स्थानिक मैदानावर पण सातपैकी पाच जरी विजय मिळाले तरी स्पर्धेच्या बाद फेरीसाठी पात्र ठरण्यास पुरेसे आहेत. अर्थात याला अपवादही आहे. काही मोसमांपूर्वी हैदराबाद संघ घरच्या मैदानावर सातत्याने पराभूत होत होता. चाहत्यांनी त्यावर उपाय सुचविला. होमग्राऊंड म्हणून अन्य मैदानाची निवड करावी असे त्यावेळी सुचविण्यात आले होते.चिन्नास्वामीवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने नुकतेच काही सामने गमविले. मुंबईविरुद्ध त्यांना आपल्या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. दुसऱ्या सामन्यात पुण्याने दिलेले आव्हान त्यांना गाठता आले नव्हते. आरसीबीला गोलंदाजीत समन्वय साधण्यात अद्याप अपयश आलेले दिसत नाही. दुसरीकडे पुण्याविरुद्ध फलंदाजीही ढेपाळल्याने चिंतेत भर पडली. सामन्यात चारच विदेशी खेळाडू खेळविण्याची अट असल्याने आरसीबीने ख्रिस गेलच्या तुलनेत सॅम्युअल बद्री या लेग स्पिनरला प्राधान्य दिले. मुंबईविरुद्ध त्याने हॅट्ट्रिक नोंदविल्याने बद्रीकडून अपेक्षा होती पण कोहली आणि डिव्हिलियर्स अपयशी ठरल्यानंतर केदार जाधव, वॉटसन, बिन्नी यापैकी एकही फलंदाज संघासाठी ‘तारणहार’ ठरू शकला नाही. विदेशी खेळाडूंची निवड करण्यात गुजरात संघाला असाच त्रास जाणवतो. अॅण्ड्र्यू टाय या संघाला चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रवीण कुमार आणि मुनाफ पटेल हे चांगले गोलंदाज असले तरी दोघांच्याही माऱ्याची धार बोथट झाल्यासारखी वाटतो. फलंदाजीत हा संघ मॅक्यूलम, रैना आणि स्मिथ यांच्यावर विसंबून आहे. अॅरोन फिंचने फटकेबाजी केली तर धावांची गती वाढू शकते.नाणेफेकही दुर्दैवाने महत्त्वपूर्ण ठरत आहे. नाणेफेक जिंकणारे संघ बहुदा सामनेही जिंकत आहेत. पण स्पर्धा पुढे सरकेल तेव्हा वेगळे निकाल लागण्याची अपेक्षा आहे. चाहते आणि प्रेक्षकांना नाणेफेक जिंकणारा संघ विजयी होईलच याची खात्री नसलेले रोमहर्षक निकाल यायला हवेत.(पीएमजी)