शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

सेरेना, मरे, रंदावास्का चौथ्या फेरीत

By admin | Published: July 04, 2016 5:50 AM

ब्रिटनचा अँडी मरे आणि तृतीय मानांकित पोलंडची एग्निज्स्का रंदावास्का यांनी आगेकूच करताना चौथी फेरी गाठली.

लंडन : विम्बल्डनचा सनसनाटी निकालाची मालिका थांबविताना गत चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम, द्वितीय मानांकित ब्रिटनचा अँडी मरे आणि तृतीय मानांकित पोलंडची एग्निज्स्का रंदावास्का यांनी आगेकूच करताना चौथी फेरी गाठली.आपल्या २२ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या प्रयत्नात असणाऱ्या सेरेनाने दुसऱ्या फेरीत जर्मनीच्या एनिका बेक हिचा ५१ मिनिटांत ६-३, ६-० असा सहज पराभव केला. सेरेनाला दुसऱ्या फेरीत तिच्याच देशाच्या क्रिस्टिना मॅकहेल हिला पराभूत करण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला होता.गत चॅम्पियन खेळाडूची चौथ्या फेरीत रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोव्हा हिच्याविरुद्ध लढत होईल. स्वेतलाना हिने तिसऱ्या फेरीत १८ व्या मानांकित अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्स हिचे आव्हान ६-७, ६-२, ८-६ असे मोडीत काढले. दरम्यान, पुरुष गटात २०१३ चा विम्बल्डन चॅम्पियन आणि द्वितीय मानांकित मरे याने आॅस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याचा ६-३, ७-५, ६-२ असा सलग सेटमध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचा सॅम क्वेरीकडून झालेल्या सनसनाटी पराभवानंतर मरे याच्या विजयाचे वृत्त आले. (वृत्तसंस्था)>पेसचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टातलिएंडर पेस आणि पोलंडचा त्याचा जोडीदार मार्सिन मात्कोवस्की यांना जॉन पीयर्स आणि हेन्री कोंटिनेन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले.पीयर्स व कोंटिनेन या फिनलँड आणि आॅस्ट्रेलियाच्या दहाव्या मानांकित जोडीने दुसऱ्या फेरीत पेस व मात्कोवस्की यांचा ६-३, ६-२ असा अवघ्या ६२ मिनिटांत पराभव केला. पीयर्स आणि कोंटिनेन यांची पुढील फेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि रोमानियाच्या फ्लोरिन मर्जिया या दहाव्या मानांकित जोडीविरुद्ध लढत होणार आहे. >सानिया-हिंगीस जोडी दुसऱ्या फेरीत भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्सर्लंडची मार्टिना हिंगीसने जर्मन जोडी अ‍ॅना लेना फ्रिडसॅम आणि एल. सेजमंड जोडीला ६-२, ७-५ असे पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सानिया-हिंगीसने हा लढत एक तास २१ मिनिटांत जिंकली. दुसरीकडे पुरुष दुहेरीत भारताचा रोहण बोपण्णा आणि त्याचा रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मेर्जियाने सहावी मानांकित जोडी स्लोवाकियाचा आंद्रेज मार्टिन आणि चिलीचा हेंस केस्टिलो या जोडीला १ तास १८ मिनिटे चाललेल्या सामन्यात ७-५, ६-२ असे नमविले.