नवी दिल्ली : कोलंबियाच्या सांतियागो गिराल्डोचा पराभव करीत इंग्लंडच्या अॅँडी मरे याने मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कारकिर्दीतील हा त्याचा ४९९ वा विजय ठरला. स्पर्धेत सर्वात धक्कादायक निकाल ठरला तो नदाल आणि सेरेना यांचा. जगात ३४ व्या क्रमांकावर असलेल्या स्पेनच्या फर्नांडो वर्दास्को याने नदालला ६-४, २-६, ६-३ ने, तर अव्वल मानांकित सेरेना विल्यम्स हिला सिसि बेलिसने ६-१, ६-१ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. हे दोन्ही दिग्गज स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. फर्नांडो वर्दास्कोकडून झालेल्या पराभवामुळे आपण खूप निराश झालो, अशी कबुली दिग्गज टेनिसपटू रॅफेल नदालने सामन्यानंतर दिली. दुसरा मानांकित खेळाडू म्हणाला, की गेल्या वेळी झालेल्या दुखापतीमुळे मी पराभूत झालो हे सांगणे चुकीचे ठरेल. कोर्टवरील स्वयंनियंत्रण कुठे तरी कमी पडले, त्यामुळेच पराभवाचा सामना करावा लागला.(वृत्तसंस्था)
सेरेना, नदाल ‘अपसेट’
By admin | Published: March 30, 2015 11:54 PM