शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
5
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
6
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
7
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
8
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
9
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
10
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
11
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
12
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
13
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
14
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
16
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
17
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
18
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
19
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
20
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!

सेरेना, नदालची शानदार सलामी

By admin | Published: January 18, 2017 4:14 AM

राफेल नदाल यांनी लौकिकाला साजेशी कामगिरी करताना आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

मेलबोर्न : सेरेना विलियम्स व स्पॅनिश स्टार राफेल नदाल यांनी लौकिकाला साजेशी कामगिरी करताना आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुखापतीमुळे काही महिने कोर्टपासून दूर असलेल्या सेरेनाने स्वित्झर्लंडची युवा स्टार बेलिंडा बेनसिचचा ६-४, ६-३ ने सहज पराभव केला. नदालने जर्मनीच्या फ्लोरिन मेयरविरुद्ध ६-३, ६-४, ६-४ ने सरशी साधली. मेलबोर्न पार्कवर दिवसाचे तापमान ३७ अंश होते; पण यूएस ओपनच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर अधिक सामने न खेळणाऱ्या सेरेनाने पहिल्या फेरीत चमकदार कामगिरी करीत प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला. बेनसिचने पहिल्या सेटमध्ये काहीअंशी आव्हान देण्याचा प्रयत्न केला; पण दुसऱ्या सेटमध्ये सेरेनाच्या आक्रमक खेळापुढे तिचा निभाव लागला नाही. अलीकडे रेडिटचे सहसंस्थापक अ‍ॅलेक्सिस ओहानियनसोबत साखरपुडा करणाऱ्या सेरेनाचे लक्ष्य २३वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावत स्टेफी ग्राफचा ओपन युगातील २२ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाचा विक्रम मोडण्याचे आहे. सेरेनाची पुढच्या फेरीत गाठ चेक प्रजासत्ताकच्या लुसी सॅफरोव्हाविरुद्ध पडणार आहे. सॅफरोव्हाने यानिना विकमेयरची झुंज ३-६, ७-६, ६-१ ने मोडून काढली. यूएस ओपनमध्ये सेरेनाचा पराभव करणाऱ्या पाचवे मानांकनप्राप्त चेक प्रजासत्ताकच्या कारोलिना पिलिसकोव्हाने स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्मोचा ६-२, ६-० ने धुव्वा उडविला. पिलिसकोव्हाला पुढच्या फेरीत पात्रता फेरीचा अडथळा पार करणाऱ्या अन्ना ब्लिनकोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ब्लिनकोव्हाने रोमानियाच्या मोनिका निकोलेस्कूचा पराभव केला. गेल्या आठवड्यात सिडनी इंटरनॅशनलमध्ये जेतेपद पटकावणारी नववे मानांकनप्राप्त ब्रिटिश खेळाडू कोंटाने बेल्जियमच्या ख्रिस्टीन फ्लिपकेन्सचा ७-५, ६-२ ने पराभव करीत पुढची फेरी गाठली.ब्रिटनच्या हीथन वॉटसनने यूएस ओपनची माजी विजेता व १८वे मानांकनप्राप्त सामांता स्टोसूरची झुंज ६-३, ३-६, ६-० ने मोडून काढली, तर डोमिनका सिबुलकोव्हाने डेनिसा अलाटोंवाचा ७-५, ६-२ ने पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. १७वे मानांकनप्राप्त डेन्मार्कची कारोलिन व्होज्नियाकीने आॅस्ट्रेलियाच्या एरिना रोडियोनोव्हाचा ६-१, ६-२ ने सहज पराभव केला, तर १४वे मानांकनप्राप्त रशियाच्या इलेना वेसनिनाने रोमानियाच्या अन्ना बोगडनवर ७-५, ६-२ ने मात केली. पुरुष विभागात तिसरे मानांकनप्राप्त कॅनडाचा मिलोस राओनिचने जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनचा ६-३, ६-४, ६-२ ने पराभव केला. जर्मनीच्या अलेक्सांद्र जेवेरेव्हने रोबिन हॉसची झुंज पाच सेट््समध्ये ६-२, ३-६, ५-७, ६-३, ६-२ ने मोडून काढली. ० व्या मानांकित इव्हो कार्लोविचने अर्जेंटिनाच्या होरासियो जेबालोसविरुद्ध दोन सेट गमावल्यानंतर पुनरागमन केले. पाच तास १४ मिनिटे रंगलेल्या लढतीत कार्लोविचने ६-७, ३-६, ७-५, ६-२, २२-२० ने विजय मिळवला. सहाव्या मानांकित फ्रान्सच्या गेल मोनफिल्सने चेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्लीचा ६-२, ६-३, ६-२ ने, आठव्या मानांकित डोनिनिक थीमने जर्मनीच्या यान लेनार्ड स्ट्रफचा ४-६, ६-४, ६-४, ६-३ ने आणि १३वे मानांकनप्राप्त स्पेनच्या रॉबर्टो बतिस्ताने अर्जेंटिनाच्या गुइडो पेलाचा ६-३, ६-१, ६-१ ने पराभव केला. १८वे मानांकनप्राप्त फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटने आॅस्ट्रेलियाच्या ब्लॅक मोटचा ६-४, ६-४, ६-२ ने आणि २१व्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररने आॅस्ट्रेलियाच्या ओमार जासिकाचा ६-३, ६-०, ६-२ ने पराभव केला. ११ व्या मानांकित बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनला अमेरिकेच्या रीली ओपेल्काचा ६-४, ४-६, ६-२, ४-६, ६-४ ने पराभव करताना घाम गाळावा लागला. (वृत्तसंस्था)>बेनसिच चांगली खेळाडू आहे. अलीकडेच तिला आघाडीच्या दहा खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. मी पहिल्या फेरीमध्ये आतापर्यंत खेळलेल्या लढतींच्या तुलनेत ही सर्वांत खडतर लढत होती. सर्वोत्तम कामगिरी करणे आवश्यक होते. माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. मी खेळाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे.-सेरेना विलियम्स>जोकोव्हिचला स्पेनच्या फर्नांडो वर्डास्कोविरुद्ध दुसऱ्या सेटमध्ये संघर्ष करावा लागला; पण दुसऱ्या मानांकित सर्बियाच्या या खेळाडूने मोक्याच्या क्षणी गुण वसूल करीत ६-१, ७-६, ६-२ ने सरशी साधली. वर्डास्कोने गेल्या वर्षी नदालचा पहिल्या फेरीत पराभव केला होता.