शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

सेरेना सुपरचॅम्प

By admin | Published: January 31, 2015 11:25 PM

रशियाच्या मारिया शारापोवाला ६-३, ७-६ असे सरळ सेटमध्ये हरवून आॅस्ट्रेलियन ओपनचे सहावे, तर कारकिर्दीतील १९वे ग्रँडस्लॅम जिंकले आहे.

आॅस्ट्रेलियन ओपन : शारापोवाला हरवून जिंकले वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम मेलबोर्न : अमेरिकेची टॉप सिडेड सेरेना विल्यम्स हिने आज येथे झालेल्या अंतिम सामन्यात रशियाच्या मारिया शारापोवाला ६-३, ७-६ असे सरळ सेटमध्ये हरवून आॅस्ट्रेलियन ओपनचे सहावे, तर कारकिर्दीतील १९वे ग्रँडस्लॅम जिंकले आहे.ग्रँडस्लॅम स्पर्धेची २३वी फायनल खेळणाऱ्या सेरेनाने पहिला सेट एकतर्फीच जिंकला. रशियन ब्यूटीने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण ती अपयशी ठरली. शारापोवाची सुरवातच खराब झाली. तिने पहिल्याच गेममध्ये दुहेरी चूक करून आपली सर्व्हिस गमावली. सेरेना ३-२ अशी आघाडीवर असताना पाऊस आल्याने छत झाकण्यात आले. यासाठी १३ मिनिटे सामना थांबविण्यात आला.सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर सेरेनाने आपली लय गमावली नाही. त्यानंतर शारापोवाच्या दुहेरी चुकीमुळे सेरेनाला ३ ब्रेक पॉर्इंट मिळाले. याचा तिने पुरेपूर फायदा उठविला. त्यानंतर सेरेनाने दुहेरी चूक केल्यामुळे शारापोवाला आपली सर्व्हिस तोडण्याची संधी दिली; परंतु पुढच्याच गेममध्ये सेरेनाने शारापोवाची सर्व्हिसही तोडून पहिला सेट आरामात जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये शारापोवाने थोडीफार झुंज दिली. तिने सेरेनाच्या सर्व्हिसवर आक्रमक होण्याचा प्रयत्न केला; परंतु अमेरिकन चॅम्पने तिचा प्रतिकार मोडून काढला. दोघींनीही यानंतर आपली सर्व्हिस राखल्यामुळे सेट टायब्रेकपर्यंत ताणला गेला. सेरेनाने त्यानंतर ६-५च्या स्कोअरवर ऐससोबत सामना आणि किताब आपल्या नावावर केला.(वृत्तसंस्था)स्टेफीपाठोपाठ सेरेनाया विजयाबरोबरच सेरेना १८ वेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या मार्टिना नवरातिलोवा आणि ख्रिस एवर्टला मागे टाकले आहे. या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून, पहिल्या क्रमांकावर सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम जिंकणारी स्टेफी ग्राफ आहे.शारापोवावरील वर्चस्व कायमसेरेनाने शारापोवावरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सेरेनाचा हा शारापोवावरील सलग १६वा विजय आहे. ती आॅस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत सहा वेळा पोहोचली असून, या सहाही वेळा तिने अजिंक्यपद पटकावले आहे. सेरेनाची या स्पर्धेतील गत कामगीरीच्२००३ : सेरेना वि.वि. व्हीनस विल्यम्स ७-६ (७-४), ३-६, ६-४च्२००५ : सेरेना वि.वि. लिंडसे डेव्हनपोर्ट २-६, ६-३, ६-०च्२००७ : सेरेना वि.वि. मारिया शारापोवा ६-१, ६-२च्२००९ : सेरेना वि.वि. दिनारा साफिन ६-०, ६-३च्२०१० : सेरेना वि.वि. जस्टीन हेनिन ६-४, ३-६, ६-२मारिया शारापोवाची स्पर्धेतील गत कामगीरीच्२०१२ : मारिया शारापोवा प. वि. व्हिक्टोरिया अजारेंका ३-६, ०-६