शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

सेरेना, वावरिंका, मरे उपउपांत्यपूर्व फेरीत

By admin | Published: September 05, 2016 5:46 AM

सेरेना विलियम्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची चौथी फेरी गाठताना विक्रम नोंदविला

न्यूयॉर्क : सेरेना विलियम्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची चौथी फेरी गाठताना विक्रम नोंदविला, तर पुरुष एकेरीत जेतेपदाचा प्रबळ दावेदार अ‍ॅन्डी मरे व स्टेनिसलास वावरिंका यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दोनदा उपांत्य फेरी गाठणाऱ्या वावरिंकाला विजय मिळविताना घाम गाळावा लागला. दोनदा ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकाविणाऱ्या वावरिंकाने मॅच पॉइंटचा बचाव करताना ब्रिटनच्या डेव्ह इव्हान्सची झुंज ४-६, ६-३, ६-७, ७-६, ६-२ ने मोडून काढली. मरेला इटलीच्या पाओलो लोरेंजीचा ७-६, ५-७, ६-२, ६-३ ने पराभव करताना संघर्ष करावा लागला. मरेला पुढच्या फेरीत बुल्गारियाच्या ग्रीगोर दिमित्रोव्हच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दिमित्रोव्हने पोर्तुगालच्या जाओ सोसाचा ६-४, ६-१, ३-६, ६-२ ने पराभव केला. वावरिंकाला पुढच्या फेरीत जागतिक क्रमवारीत ६३ व्या स्थानावर असलेल्या युक्रेनच्या इलया मार्चेंकोच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मार्चेंको निक किर्गियोसविरुद्धच्या लढतीत ६-४, ४-६, १-६ ने पिछाडीवर होता. दुखापतीमुळे किर्गियोसने या लढतीतून माघार घेतल्यामुळे मार्चेंकोचा पुढच्या फेरीचा मार्ग सुकर झाला. सहावे मानांकन प्राप्त जपानच्या केई निशिकोरीने पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन करीत फ्रान्सच्या निकोलस माहुतचा ४-६, ६-१, ६-२, ६-२ ने पराभव केला. निशिकोरीला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी इव्हो कार्लोविचच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. कार्लोविचने अमेरिकेच्या जेयर्ड डोनाल्डसनचा ६-४, ७-६, ६-३ ने पराभव केला. जुआन मार्टिन डेल पोत्रोने ११ व्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररचा ७-६, ६-२, ६-३ ने पराभव केला. महिला एकेरीत चौथ्या मानांकित अ‍ॅग्निस्का रदवांस्काने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाचा ६-२, ६-३ ने सहज पराभव केला. पाचव्या मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपने हंगेरीच्या टिमिया बाबोसची झुंज ६-१, २-६, ६-४ ने मोडून काढली तर व्हीनस विलियम्सने जर्मनीच्या लारा सिडमंडचा ६-१, ६-२ ने सहज पराभव केला. (वृत्तसंस्था)>सानिया, बोपन्नाची आगेकूच, पेसचे आव्हान संपुष्टात भारताची सानिया मिर्झा व रोहन बोपन्ना यांनी आपापल्या सहकाऱ्यांसह अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुढची फेरी गाठली, पण लिएंडर पेसचे आव्हान संपुष्टात आले. पेस व मार्टिना हिंगीस या जोडीला मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला.सानिया-बारबरा या सातव्या मानांकित जोडीला पुढच्या फेरीत निकोल गिब्स व नाओ हिबिनो या बिगरमानांकित जोडीसोबत लढत द्यावी लागेल. बोपन्ना व कॅनडाची त्याची सहकारी गॅब्रियला दाब्रोवस्की यांनी लुकास कुबोट व एंड्रिया हलावाकोव्हा यांची झुंज ५-७, ६-३, १०-७ ने मोडून काढत मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. क्वार्टर फायनलमध्ये या जोडीला रॉबर्ट फराह व अ‍ॅना लेना ग्रोनफेल्ड या बिगरमानांकित जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. गत चॅम्पियन पेस व हिंगीस या जोडीला कोको वांदेवेघे व राजीव राम या अमेरिकन जोडीविरुद्ध ७-६, ३-६, १३-११ ने पराभव स्वीकारावा लागला. या लढतीत टायब्रेकमध्ये एकवेळ पेस-हिंगीस जोडी ८-४ ने आघाडीवर होती, पण तरी त्यांना पराभव स्वीकारावा लागला.>या निकालासह सेरेनाने मार्टिना नवरातिलोव्हाचा गॅॅ्रण्डस्लॅम स्पर्धेत महिला खेळाडूने नोंदविलेला सर्वाधिक ३०७ सामने जिंकण्याचा विक्रम मोडला. सेरेनाला नवरातिलोव्हाचा विक्रम मोडण्याव्यतिरिक्त पुरुष विभागात रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली.>सानिया मिर्झा व चेक प्रजासत्ताकची बारबरा स्ट्राइकोव्हा यांनी व्हिक्टोरिया गोलुबिच व निकोल मेलिचार यांचा ६-२, ७-६ ने पराभव करीत महिला दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.