ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. ९ : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला गटातील अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सचे २३व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे स्वप्न भंगले आहे. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिनाने तिचा पराभव करत अमेरिकन ओपन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे. दहाव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाने सेरेनाचा ६-२, ७-६ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.
तत्पूर्वी सेरेना विलियम्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची चौथी फेरी गाठताना विक्रम नोंदविला होता पण कॅरोलिनाने तिचा विजयरथ रोखला. या पराभवामुळे सेरेना विल्यम्सने प्रथम स्थान गमावले आहे. त्यामुळे एकाच वेळी तिला दोन धक्के बसले आहेत.