शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

सेरेनाचा विक्रमी विजय, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

By admin | Published: September 06, 2016 6:58 AM

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला गटातील अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने विक्रमी 308 व्या विजयाची नोंद केली.

ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. 6 - अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला गटातील अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने विक्रमी 308 व्या विजयाची नोंद केली. तिने शेडोव्हाचा 6-2 व 6-3 असा पराभव करुन उपांत्यपूर्व फेरी गाठली. 307 सामन्यात विजय नोंदवन्याचा विक्रम रॉजर फेडररच्या नावे होता. तत्पूर्वी सेरेना विलियम्सने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची चौथी फेरी गाठताना विक्रम नोंदविला होता, तर पुरुष एकेरीत जेतेपदाचा प्रबळ दावेदार अ‍ॅन्डी मरे व स्टेनिसलास वावरिंका यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दोनदा उपांत्य फेरी गाठणाऱ्या वावरिंकाला विजय मिळविताना घाम गाळावा लागला. दोनदा ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकाविणाऱ्या वावरिंकाने मॅच पॉइंटचा बचाव करताना ब्रिटनच्या डेव्ह इव्हान्सची झुंज ४-६, ६-३, ६-७, ७-६, ६-२ ने मोडून काढली. मरेला इटलीच्या पाओलो लोरेंजीचा ७-६, ५-७, ६-२, ६-३ ने पराभव करताना संघर्ष करावा लागला. मरेला पुढच्या फेरीत बुल्गारियाच्या ग्रीगोर दिमित्रोव्हच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दिमित्रोव्हने पोर्तुगालच्या जाओ सोसाचा ६-४, ६-१, ३-६, ६-२ ने पराभव केला. वावरिंकाला पुढच्या फेरीत जागतिक क्रमवारीत ६३ व्या स्थानावर असलेल्या युक्रेनच्या इलया मार्चेंकोच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.मार्चेंको निक किर्गियोसविरुद्धच्या लढतीत ६-४, ४-६, १-६ ने पिछाडीवर होता. दुखापतीमुळे किर्गियोसने या लढतीतून माघार घेतल्यामुळे मार्चेंकोचा पुढच्या फेरीचा मार्ग सुकर झाला. सहावे मानांकन प्राप्त जपानच्या केई निशिकोरीने पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन करीत फ्रान्सच्या निकोलस माहुतचा ४-६, ६-१, ६-२, ६-२ ने पराभव केला. निशिकोरीला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी इव्हो कार्लोविचच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. कार्लोविचने अमेरिकेच्या जेयर्ड डोनाल्डसनचा ६-४, ७-६, ६-३ ने पराभव केला. जुआन मार्टिन डेल पोत्रोने ११ व्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररचा ७-६, ६-२, ६-३ ने पराभव केला. महिला एकेरीत चौथ्या मानांकित अ‍ॅग्निस्का रदवांस्काने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाचा ६-२, ६-३ ने सहज पराभव केला. पाचव्या मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपने हंगेरीच्या टिमिया बाबोसची झुंज ६-१, २-६, ६-४ ने मोडून काढली तर व्हीनस विलियम्सने जर्मनीच्या लारा सिडमंडचा ६-१, ६-२ ने सहज पराभव केला.