बुलावायो : न्युझिलंडने उभ्या केलेल्या ५७६ धावांच्या डोंगरापुढे दुबळ््या झिम्बाब्वेने सपशेल शरणागती पत्करली. पहिल्या डावात १६४ आणि दुसऱ्या डावात ५ बाद १२१ धावा केल्या आहेत. न्युझिलंड विरुद्ध झिम्बाब्वे कसोटी मालिकेच्या पह्ल्यिा सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा केल्या. नील वॅगनर याने सहा गडी बाद करत झिम्बाब्वेची फलंदाजी मोडून काढली. त्याने सलामीवीर चिभाभा, सीन विल्यम्स, सिकंदर रजा, कर्णधार क्रीमर यांना बाद केले. तर मिशेल सेंटनर याने दोन गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. टीम साउदीनेही दोन गडी बाद केले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या न्युझिलंडच्या फलंदाजांनी ५७६ धावांचा डोंगर उभा केला. सह गडी बाद झाल्यावर न्युझिलंडने डाव घोषित केला. टीम लॅथम, रॉस टेलर, बी.जे.वॅटलिंग यांनी शतके झळकावताना झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. लॅथमने १०५, टेलरने १७३, वॅटलींगने १०७ धावा केल्या. कर्णधार केन विल्यमसन शतकाच्या उंबरठ्यावर असताना ९१ धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावातही झिम्बाब्वेचे आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले. फक्त १७ धावांतच सुरूवातीचे चार फलंदाज तंबूत परतले. चिभाभा (७), हॅमिल्टन मस्कदझा (४), चारी (५), मसावुरे (०) हे सुरूवातीच्या १७ धावातच बाद झाले. त्यानंतर एरवीन नाबाद ४९ आणि सिकंदर रजा यांनी ६९ धावांची खेळी केली. मात्र वॅगनर याने रझाला बाद करत ही भागिदारी संपुष्टात आणली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा एरवीन ४९ तर क्रीमर १४ धावांवर खेळत होते. >संक्षिप्त धावफलक : झिम्बाब्वे पहिला डाव सर्वबाद १६४, न्युझिलंड पहिला डाव ६ बाद ५७६ घोषीत, झिम्बाब्वे दुसरा डाव ५/१२१ (चामु चिभाभा ७, हॅमिल्टन मस्कदझा ४, ब्रायन चारी ५,सिंकदर रजा ३७, मसावुरे ०, क्रेग एरवीन खेळत आहे ४९, ग्रीम क्रिमर १४ गोलंदाजी : टीम साऊदी १/३५, ट्रेंट बोल्ट ३/३३, नील वेगनर १/१८)
झिम्बाब्वे पराभवाच्या छायेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2016 5:42 AM