चांगवोन (दक्षिण कोरीया) भारताच्या शहजार रिज्वीने पुरूषांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात रौप्य पदक जिंकून आयएसएसएफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे खाते उघडले.
मार्च महिन्यात मेक्सिको येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱ्या रिज्वीने २४० गुणांसह सुवर्णपदक आपल्या नावावर केले होते. पण, या स्पर्धेत त्याचा ०.२ गुणांनी नेम चुकल्यामुळे त्याला रौप्यपदक आपल्या नावावर केले. या स्पर्धेत त्याने २३९.८ गुण संपादन केले. या प्रकारात रशियाच्या आर्तेंम चेर्नोसोव्हने २४० गुणांसह सुवर्ण आणि बुल्गेरीयाच्या समुइल दोनकोव्हला २१७.१ गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.या स्पर्धेत पहिल्या दोन दिवसांत एकही भारतीय नेमबाज पदक जिंकू शकला नाही. मंगळवारी रिज्वीच्या व्यतिरिक्त राष्टÑकुल स्पर्धेतील पदक विजेते जीतू राय आणि ओम प्रकाश मिथारवल यांच्याकडून पदकांच्या अपेक्षा होत्या. रिज्वीने पात्रता फेरीत ५८२ गुण संपादन करून सहाव्या क्रमांकावर राहून अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. जीतू राय व प्रकाश मिथारवल हे दोघेही अंतिम फेरीत प्रवेश करू शकले नाही. मिथारवल ५८१ गुणांसह ११ व्या तर जीतू ५७५ गुणांसह ३८ व्या स्थानी राहिले.