रोहित नाईक, मुंबईशाकिब अल हसन (२/१७) आणि मोर्नी मोर्कल (१/२७) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट राइडर्स संघाने इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत मुबंई इंडियन्स संघाची १० षटकांपर्यंत ३ बाद ६७ अशी स्थिती केली होती.कोलकाता नाईट राइडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय शाकिब आणि मोर्कलने त्यचा हा निर्णय योग्य ठरविला. मुबंईची आघाडीची जोडी लेंडल सिमन्स (१४) व पार्थिव पटेल (२१) संघाच्या ४२ धावा असताना तंबूत परतले. नंतर रोहित शर्मा एकबाजू संभाळत असताना दुसऱ्या बाजूला अंबाती रायडू (२) सुध्दा लवकर बाद झाला. कोलकाताकडून मार्कलने सिमन्सला तर शाकिबने पाीिर्थव पटेल व अंबाती रायडूला बाद केले.
शाकिब, मोर्कलच्या गोलंदाजीमुळे मुंबई ३ बाद ६७
By admin | Published: May 15, 2015 1:08 AM