शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

शार्दुलची विजयी सलामी

By admin | Published: January 29, 2016 3:29 AM

महाराष्ट्राचा अग्रमानांकीत खेळाडू शार्दुल गागरे याने अपेक्षित कामगिरी करताना ओम खारोलाचा सहज पाडाव करुन पहिल्या मुंबई आंतरराष्ट्रीय खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत विजयी सलामी दिली

मुंबई : महाराष्ट्राचा अग्रमानांकीत खेळाडू शार्दुल गागरे याने अपेक्षित कामगिरी करताना ओम खारोलाचा सहज पाडाव करुन पहिल्या मुंबई आंतरराष्ट्रीय खुल्या बुध्दिबळ स्पर्धेत विजयी सलामी दिली. शार्दुलसह इतर अव्वल खेळाडूंनीही अपेक्षित विजय मिळवताना स्पर्धेत दमदार आगेकूच केली.महाराष्ट्र बुध्दिबळ संघटेने अंतर्गत बीकेसी (वांद्रे) येथील सेंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत शार्दुलने पहिल्याच फेरीत आपल्या आक्रमक खेळाची झलक दाखवून प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा दिला. विशेष म्हणजे ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठी शार्दुलला केवळ ३ गुणांची आवश्यकता असूंन यासाठी त्याला सलग तीन लढती जिंकने जरुरी आहे. या विजयासह पुढील दोन लढती जिंकून शार्दुल ग्रँडमास्टर ठरतो क, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरले आहे.काळ्या मोहऱ्यांनी खेळताना शार्दुलने फ्रेंच ओपनींगद्वारे बचावात्मक सुरुवात केली. ओमने किंग पॉन ओपनिंग करुन आपले इरादे स्पष्ट केल्यानंतर शार्दुलने त्याच्या चालींचा अंदाज घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मध्यंतराला शार्दुलने जबरदस्त आक्रमण करताना हत्ती व घोड्याच्या मदतीने वझीरची चाल रचली. या तुफान आक्रमणामुळे भांबावलेल्या ओमकडून चुका होऊ लागल्या. त्याचा पुरेपूर फायदा घेत शार्दुलने ओमच्या राजाला सातत्याने चेक देण्याचा सपाटा लावला. अखेर ४०व्या चालीवर ओमने शार्दुलच्या आक्रमणापुढे शरणागती पत्करली. इंटरनॅशनल मास्टर शरद टिळकला पहिल्याच सामन्यात बरोबरी मान्य करावी लागली. सिक्का आन विरुध्द चांगली सुरुवात केल्यानंतर विनाकारण बचावात्मक पवित्रा घेतलेल्या शरदवर दबाव टाकण्यात सिक्काने यश मिळवले.पहिल्या फेरीचे निकालओम खरोला पराभूत वि. शार्दुल गागरे; स्वप्नील धोपडे वि.वि. सेल्वाभारती टी.; अरविंद बाबू एल. पराभूत वि. स्टॅनी जी. ए.नितीन एस. वि.वि. अजिंक्य पिंगळे; दुश्यंत शर्मा पराभूत वि. हिमांशू शर्मा; रवी तेजा एस. वि.वि. रुपेश भोगल. देव शाह पराभूत वि. अक्षत खंपारीया; दिनेश शर्मा वि.वि. सौमील नायर; अभिजीत जोगळेकर पराभूत वि. गुसैन हिमाल; खुशी खंडेलवाल पराभूत वि. विक्रमादित्य कुलकर्णी.