शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

शास्त्री प्रशिक्षकपदाच्या स्पर्धेतून बाहेर? विराटपुढे दोन पर्याय

By admin | Published: July 10, 2017 7:34 PM

विराटने समजून घ्यायला हवे. विराटशी चर्चा केल्यानंतर प्रशिक्षकपदाची निवड करण्यात येईल. त्यासाठी क्रिकेट सल्लागार समिती त्याच्यासमोर केवळ दोनच नावांचा पर्याय देण्यात येईल.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 10 - कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केल्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची निवड करण्यात येणार असल्याचे आज क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सौरव गांगुलीनी सांगितले. यावेळी बोलताना गांगुली म्हणाला, प्रशिक्षकपदाचे काम कसे असते हे विराटने समजून घ्यायला हवे. विराटशी चर्चा केल्यानंतर प्रशिक्षकपदाची निवड करण्यात येईल. त्यासाठी क्रिकेट सल्लागार समिती त्याच्यासमोर केवळ दोनच नावांचा पर्याय ठेवील. रवी शास्त्री यांचं नाव निश्चित मानलं जात असलं तर बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारवर त्यांचं नाव स्पर्धेत नाही. विराटला दिल्या जाणाऱ्या दोन पर्यायामध्ये भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू टॉम मूडी यांचा समावेश आहे. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे रवी शास्त्री यांचीच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागेल, असा अंदाज लावला जात होता. मात्र विराटसमोर रवी शास्त्री यांच्या नावाचा पर्यायच नसेल, अशी माहिती आहे.2019 च्या वर्ल्डकपपर्यंत कोचबरोबरचा करार असेल. त्यामुळे भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा तात्काळ करण्याची गरज नाही, कर्णधार विराट कोहलीसह आणखी काही जणांबरोबर चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. असे सौरव गांगुलीने स्पष्ट केले. आज मुंबईमध्ये झालेल्या तीन सदस्यांची क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी)च्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गांगुली आणि लक्ष्मण यांनी प्रशिक्षकपदासाठीच्या थेट मुलाखती घेतल्या. तर सचिन तेंडूलकरनं स्काईपद्वारे सहभाग नोंदवला.प्रशिक्षकपदासाठी १० व्यक्तींनी बीसीसीआयकडे अर्ज सादर केले आहेत. त्यात शास्त्री यांच्याव्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, रिचर्ड पायबस, डोडा गणेश, लालचंद राजपूत, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा (ओमान राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक), फिल सिमन्स आणि उपेंद्रनाथ ब्रह्मचारी (इंजिनियर, क्रिकेटची कुठलीही पार्श्वभूमी नाही) यांचा समावेश आहे. सीएसी या १०पैकी ६ उमेदवारांची मुलाखत घेतल्याचे वृत्त आहे. अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्या वादानंतर वीरेंद्र सेहवाग याचे नाव सुरुवातीला आघाडीवर होते. मात्र, रवी शास्त्री यांच्या एन्ट्रीनंतर सध्याच्या घडीला सेहवागचे नाव मागे पडताना दिसते आहे. सचिन तेंडुलकरने देखील रवी शास्री यांच्या नावाला पसंती दिली होती. यापूर्वीच्या प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीवेळी सल्लागार समिती सदस्य सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यात वाद झाले होते. त्यात आता रवी शास्त्रींना सचिनचा पाठिंबा मिळाला आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्तीवर शिक्कामोर्तब होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.विराट कोहलीसोबत मतभेद झाल्यानंतर माजी मुख्य प्रशिक्षक व माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांनी विंडीजविरुद्धच्या मालिकेपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त आहे. कुंबळे-कोहली वादानंतर सीएसीला आपल्या पसंतीबाबत सावधगिरी बाळगावी लागेल; कारण नव्या प्रशिक्षकाला दोन वर्षांसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे. शास्त्रीने सुरुवातीला या पदासाठी अर्ज केला नव्हता. पण बीसीसीआयने अर्ज स्वीकारण्याची मुदत ९ जुलैपर्यंत वाढविली त्या वेळी माजी कर्णधार शास्त्रीने अर्ज केला. आता शास्त्री या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कोहलीसोबतच्या चांगल्या संबंधांमुळे शास्त्री या पदासाठी सर्वांत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. शास्त्री यांच्या संचालकपदाच्या कार्यकाळात भारतीय संघाने ५० षटकांच्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. शास्त्री यांच्याबाबत सौरव गांगुली यांचे मत काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शास्त्री व सौरव यांनी यापूर्वी एकमेकांवर टीका केली होती.