नवी दिल्ली : टाेकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ७ पदके जिंकून आतापर्यंतची सर्वाेत्तम कामगिरी केली आहे. पदक जिंकणाऱ्या तसेच पदकापर्यंत पाेहाेचलेल्या सर्व खेळाडूंचे देशभरात काैतुक हाेत आहे. देशाला पदक हवे असते. मात्र, त्यासाठी खेळाडू घडविण्याचे काम तेवढ्या त्वेषाने हाेत नाही. रितू ही पंजाबची मुष्टियाेद्धा आहे. तिचा संघर्ष प्रेरणादायी आहेच, पण तेवढाच हृदय पिळवटून टाकणारा आहे. तिचे वडील आजारी असून अंथरुणाला खिळून आहेत. पाेट भरण्यासाठी तिला बाॅक्सिंग ग्लाेव्ह्ज बाजूला फेकून चंदीगढ येथे पार्किंगची तिकिटे विकावी लागत आहेत. तिने राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अनेक पदकेही तिला मिळाली आहेत. मात्र, सरकारच्या माध्यमातून काेणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, अशी तिची तक्रार आहे. पदक मिळविणाऱ्या अनेक खेळाडूंची अशीच अवस्था आहे.सरकारकडून क्रीडा क्षेत्राकडे कायम दुर्लक्षसरकारकडून क्रीडा क्षेत्राकडे कायम दुर्लक्ष राहिले आहे. याचे एक उदाहरण आहे महिला मुष्टियाेद्धा रितू. आज तिच्या हाती बाॅक्सिंग ग्लाेव्हज असायला हवेत. मात्र, त्याच हातांनी ती पार्किंगचे तिकिटे देत आहे.सोशल मीडियावरून सरकारविरोधात नाराजीरितूच्या परिस्थितीबाबत साेशल मीडियावर पाेस्ट टाकल्यानंतर अनेकांनी सरकारवर टीका केली आहे. सुवर्णपदक हवे असेल तर खेळाडूंना पाठिंबा द्यायला हवा, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली. देशात क्रिकेटशिवाय इतरही अनेक खेळ आहेत जिथे सरकारच्या मदतीची गरज आहे. खेळ आणि खेळाडूंप्रती सरकारने प्रामाणिक राहिले पाहिजे, असे काहींनी सुनावले आहे.
बाॅक्सिंग ग्लाेव्हज साेडून ती विकतेय पार्किंगची तिकिटे; कुटुंबासाठी धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 6:34 AM