ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि - १७ : भारताचा फलंदाज शिखर धवन श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांपैकी उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी मुकणार आहे. शिखर धवनच्या पहिल्या कसोटी सामन्यात हाताला दुखापत झाल्याने त्याला बाकीच्या सामन्यात खेळता येणार नाही.
पहिल्या कसोटी सामन्यात शिखर धवनच्या उजव्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर झाल्याने त्याला या दुखापतीपासून बरे होण्यासाठी काही दिवस विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे श्रीलंकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेण्याचा सल्ला त्याला देण्यात आला असून आता तो विश्रांतीसाठी भारतात येणार असल्याचे समजते.
दरम्यान, शिखर धवनने पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतकी खेळी केली. मात्र, या सामन्यात भारताला ६३ धावांनी निराशाजनक हार पत्करावी लागली. श्रीलंकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.