शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

व्हॉलिबॉलमध्ये शिवामृत, समावि व शंकरराव मोहिते महाविद्यालय विजयी एस.पी.एम. स्पोर्टस् चॅम्पियनशिप स्पर्धा

By admin | Published: January 31, 2015 12:34 AM

अकलूज :

अकलूज :
येथील शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या एस.पी.एम. स्पोर्टस् चॅम्पियनशिप स्पर्धेत शिवामृत दूध संघ, सदाशिवराव माने विद्यालय व शंकरराव मोहिते महाविद्यालय या संघांनी विजय संपादन केला. स्पर्धेचे मार्गदर्शक व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
व्हॉलिबॉलच्या खुल्या गटातील अंतिम स्पर्धेत शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघ विरुद्ध स.म.शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना या दोन संघात अंतिम लढत झाली. पहिल्या फेरीत शिवामृत संघाने ४ गुणांनी आघाडी घेतली तर दुसर्‍या फेरीत १२ गुणांनी आघाडी घेत निर्विवाद विजय संपादन केला. शिवामृत संघाच्या पंडित माने-देशमुख, डॉ.रमेश पताळे, जहाँगीर सय्यद, गणेश गायकवाड, दीपक पवार, अस्लम पटेल व दत्तात्रय पाटील या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
१४ वर्षे मुले गटात सदाशिवराव माने विद्यालयाने वाघोलीच्या विजयसिंह मोहिते विद्यालयावर मात केली. १७ वर्षे मुले वयोगटात बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस यावर मात करीत सदाशिवराव माने विद्यालयाने विजेतेपद संपादित केले. १९ वर्षे मुले गटात शंकरराव मोहिते महाविद्यालयाला पराभूत करीत सदाशिवराव माने विद्यालयाने विजयावर शिक्कामोर्तब केला. खुल्या गटात शंकरराव मोहिते महाविद्यालयाने रत्नाई कृषी महाविद्यालयावर विजय मिळविला.
लंगडी स्पर्धेत ८ वर्षे मुले व मुली गटात सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागाने स.म.शंकरराव मोहिते प्रशालेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले.
१७ वर्षे मुले वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५० किलो खालील वजनीगटात संदेश जाधव (समावि, अकलूज), ५० किलो खालील वजनीगटात आयुब पठाण (महर्षी प्रशाला, यशवंतनगर), ६२ किलो खालील वजनीगटात मोहसीन सय्यद, ६९ किलो खालील वजनीगटात सत्यजित देशमुख, ८५ किलो वजनीगटात ऋतुराज गायकवाड, ९४ किलो वरील वजनीगटात अमित भोसले (सर्वजण समावि, अकलूज), ७७ किलो खालील वजनीगटात गणेश काळे, ९४ किलो खालील वजनीगटात शुभम पवार (जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, संग्रामनगर) याने विजय संपादन केला.
१७ वर्षे मुली वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४४ किलो खालील गटात कोमल लोंढे (श्री गणेश विद्यालय, पिंपळनेर), ४८ किलो खालील वजनीगटात नम्रता लोखंडे, ६९ किलो खालील वजनीगटात विशाखा वाघमारे, ६९ किलोवरील गटात ऐश्वर्या तांबे (लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर), ५३ किलो खालील गटात शीतल कोकाटे-पाटील, ५८ किलो खालील गटात प्रणाली गायकवाड (श्री हनुमान विद्यालय, लवंग), ६३ किलो खालील गटात सुजात मिसाळ (श्री विजयसिंह मोहिते विद्यालय, वाघोली) यांनी विजय मिळविला.
१९ वर्षे मुले वेटलिफ्टिंग स्पर्धेत ६२ किलो खालील गटात विनायक कवळसकर, ६९ किलो खालील गटात भीमा चव्हाण, ७७ किलो गटात समाधान बंडगर, ८५ किलो खालील गटात समाधान माने, १०५ किलो वरील गटात आकाश एकतपुरे (सर्वजण - समावि, अकलूज), ९४ किलो खालील गटात पांडुरंग बर्वे (कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय, सदाशिवनगर), १०५ किलो खालील गटात आशुतोष साठे (महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर) यांनी विजय संपादन केला.
१९ वर्षे मुली वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४८ किलो खालील गटात करुणा सोनवणे (शंकरराव मोहिते महाविद्यालय), ५३ किलो खालील गटात काजल घोगरे (महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर), ५८ किलो खालील गटात ईश्वरी शिर्के (कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय, सदाशिवनगर), ६३ किलो खालील गटात रागिणी माने (समावि, अकलूज) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
मुलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या खुल्या गटात ५६ किलो खालील गटात अविनाश कोकाटे, ६२ किलो खालील गटात योगेश शेंडगे, ६९ किलो अक्षय शेंडगे, ७७ किलो खालील गटात प्रफुल्ल कोलगे, ८५ किलो खालील गटात रामदास अंबुरे, ९४ किलो खालील गटात शेषराज घाडगे (सर्वजण - शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज), १०५ किलो खालील गटात विकास शेंडे, १०५ किलो वरील गटात बलराज झिरपे (रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या खुल्या गटात ४८ किलो खालील गटात करिना शेख, ५३ किलो खालील गटात निकिता मिसाळ, ६३ किलो खालील साक्षी वाघ (जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज), ५८ किलो खालील गटात आशा वाघ, ६९ किलो खालील गटात सारिका जाधव, ७५ किलो खालील गटात चांदनी मुलाणी, ७५ किलो वरील गटात सोनल मदने (सर्वजण: सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.