नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठीच टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठणारा भारताचा भालाफेकपटू शिवपालसिंग हा उत्साहात असला तरी, सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करायला लावणारी डायमंड लीग रद्द झाल्याची निराशा या खेळाडूृच्या चेहऱ्यावर झळकते. डायमंड लीगचे आयोजन एकूण १४ टप्प्यात करण्यात येते. त्यापैकी आठ स्पर्धा स्थगित करण्यात आल्या. याशिवाय कोरोनामुळे यंदा एकही मोठी अॅथ्लेटिक्स स्पर्धा झालेली नाही.पुढे होईलच याचीही खात्री नाही. कोरोनामुळे जगात दोन लाखावर लोकांचा मृत्यू झाला. १३ जूनपर्यंतच्या सर्व डायमंड लीग स्थगित झाल्या आहेत.४ जुलै रोजी लंडनची फेरी होईल. अंतिम फेरीचे आयोजन ११ सप्ेंटबर रोजी झ्युरिच येथे होईल.वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शिवपाल म्हणाला, ‘मागच्या वर्षी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंशी स्पर्धा करण्यात यश आले. यंदा डायमंड लीगमध्ये सहभागी व्हायचे होते, पण कोरोनामुळे माझ्या योजनांवर विरजण पडले. लॉकडाऊनआधीच मी आॅलिम्पिकची पात्रता गाठली, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. डायमंड लीगच्या आठ स्पर्धा रद्द झाल्यामुळे तयारीला वेग येऊ शकणार नाही, याची मात्र खंत आहे.’कोरोनामुळे क्रीडाविश्वातील वेळापत्रक सध्या अस्तव्यस्त झाले आहे. (वृत्तसंस्था)>आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य विजेत्या शिवपालने मागच्या वर्षी ८६.२३ मीटर भालाफेक करीत सर्वोकृष्ट कामगिरी केली. जूनमध्ये ओस्लो येथे त्याने डायमंड लीगमध्ये भाग घेतला. त्यावेळी तो आठव्या स्थानी होता. द.आफ्रिका येथील सरावस्थळी शिवपालने १० मार्च रोजी आॅलिम्पिकचे तिकीट निश्चित केले होते. टोकियोसाठी ८५ मीटर पात्रता अट असताना शिवपालने ८५.४७ मीटर भालाफेकीसह आॅलिम्पिकची पात्रता गाठली. नीरज चोप्रापाठोपाठ टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेला शिवपाल दुसरा भालाफेकपटू आहे.
CoronaVirus News: डायमंड लीग रद्द झाल्यामुळे भालाफेकपटू शिवपाल निराश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 3:23 AM