शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

ठाण्याच्या शिवतेजने तर मुंबई उपनगरच्या स्वस्तिक मंडळांनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 12:18 PM

श्री मावळी मंडळ आयोजित ७० वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

विशाल हळदे, लोकमत, ठाणे: श्री मावळी मंडळ आयोजित ९८ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७० व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात शिवतेज क्रीडा मंडळ ठाणे या संघाने अंतिम विजेतेपद मिळवले. तर, पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगरअंतिम विजेतेपद पटकावले.

महिला गटात ठाण्याच्या  शिवतेज क्रीडा मंडळ या संघाने धुळ्याच्या शिवशक्ती क्रीडा मंडळ या संघाचा अतिशय चुरशीच्या सामन्यात ४१-३७ असा ४ गुणांनी प्रभाव करून अंतिम विजेतेपद संपादित केले. शिवशक्ती क्रीडा मंडळ या संघाने नाणे फेक जिंकून क्रीडांगणाची निवड केली. सामन्यातील पहिली चढाई शिवतेज क्रीडा मंडळ संघाच्या माधुरी गवंडी हिने केली. तर, शिवशक्ती क्रीडा मंडळ संघाकडून प्रथम  चढाई सुरेखा कदम हिने केली. तिची पक्कड  शिवतेज क्रीडा मंडळाच्या रितिका फुलसंगे हिने करून आपल्या संघाचे गुणांचे खाते उघडले. त्यानंतरच्या चढाईत शिवतेज क्रीडा मंडळाच्या  खेळाडूपट्टू माधुरी गवंडी हिचा चवडा  शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या कोपरारक्षक सुरेखा कदम हिने काढून शिवशक्ती क्रीडा मंडळाने गुणांचे खाते उघडले.

त्यांनतर सामना दोन्ही संघाकडून अतिशय आक्रमक पद्धतीने खेळला गेला . सामन्याच्या ६ व्या मिनिटाला शिवतेज क्रीडा मंडळाने शिवशक्ती क्रीडा मंडळावर ७ गुणांची आघाडी घेत शिवशक्ती क्रीडा मंडळावर जवळजवळ लोन मारला होता. पण, शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या  शेवटची खेळाडू सुरेखा कदम हिने एकाच चढाईत ३ गुण मिळवत लोन फिरवून तो शिवतेज क्रीडा मंडळावर टाकला. मध्यंतराला शिवशक्ती क्रीडा मंडळाने २३-२२ अशी १ गुणांची नाममात्र आघाडी घेतली. सामना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना शिवशक्ती क्रीडा मंडळाकडे ८ गुणांची आघाडी होती. मात्र त्यानंतर शिवतेज क्रीडा मंडळाची चढाईपट्टू  माधुरी गवंडी  हिने अष्टपैलू खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या भराभर वाढवत सामना एक हाती जिंकून आपल्या संघास अंतिम विजेतेपद मिळवले.पुरुष गटातील अंतिम सामना  उत्कर्ष क्रीडा मंडळ  मुंबई उपनगर विरुद्ध स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर ह्या दोन संघामध्ये झाला.  सामन्यात मुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने  मुंबई उपनगरच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाचा २८-१९ असा ९ गुणांनी पराभव करीत अंतिम विजेतेपद मिळवले. उत्कर्ष क्रीडा मंडळाने नाणे फेक जिंकून क्रीडांगणाची निवड केली. स्वस्तिक क्रीडा मंडळाच्या अक्षय बर्डे याने प्रथम चढाई करून आपल्या पहिल्याच चढाईत ३ गुणांची कमाई करीत आपल्या संघाचे गुणांचे खाते उघडले.  उत्कर्ष क्रीडा मंडळाकडून राकेश हेडगे याने पहिली चढाई केली व त्याने आपल्या पहिल्या चढाईत बोनसगुण घेत आपल्या संघाचे गुणांचे खाते उघडले. सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळाच्या अक्षय बर्डे व अकराम शेख यांनी अतिशय आक्रमक खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवून मध्यंतराला १४-०९ अशी ५ गुणांची आघाडी घेतली. सामन्याचा उत्तरार्धात उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या राकेश हेगडे याने अतिशय खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो  आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही.

स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरणाचा समारंभ प्रमुख पाहुणे मा. श्री. पांडुरंग चाटे (प्रादेशिक निर्देशक भारतीय खेल प्राधिकरण, आय आर एस )  यांच्या शुभहस्ते झाला.  या वेळी विशेष अतिथी म्हणून मा. डॉ. अरुण सावंत (माजी प्र-कुलगुरू मुंबई विद्यापीठ,  माजी प्र-कुलगुरू राजस्थान  विद्यापीठ) हे उपस्थित होते.   त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष श्री. कृष्णा डोंगरे, उपाध्यक्ष श्री. सुधाकर मोरे, चिटणीस श्री.रमण गोरे, उप चिटणीस श्री. रमण गोरे, उपचिटणीस श्री. संतोष सुर्वे, सहचिटणीस श्री. चिंतामणी पाटील , खजिनदार श्री. मिलिंद यादव, विश्वस्त श्री. प्रभाकर सुर्वे व   विश्वस्त श्री. केशव मुकणे हे उपस्थित होते.

स्पर्धेतील पारितोषिके:

महिला गट:

  • अंतिम विजेता : शिवतेज क्रीडा मंडळ, ठाणे
  • अंतिम उपविजेता : शिवशक्ती क्रीडा मंडळ,धुळे 
  • उप उपांत्य विजेता : श्री राम, पालघर व शिवशक्ती महिला संघ, मुंबई शहर
  • स्पर्धेतील सर्वोत्कुष्ट खेळाडू : माधुरी गवंडी (शिवतेज क्रीडा मंडळ, ठाणे)        
  • स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू : विद्या डोलताडे (शिवशक्ती क्रीडा मंडळ, धुळे)
  • स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पक्कडपट्टू  : तेजश्री सुंबे (शिवतेज क्रीडा मंडळ, ठाणे)
  • २०/०४/२०२३ दिवसाचा उत्कुष्ट चढाईपट्टू : ऐश्वर्या ढवण (श्री राम, पालघर)
  • २०/०४/२०२३दिवसाची उत्कुष्ट पक्कडपट्टू   : दिपाली सुर्वे (शिवतेज क्रीडा मंडळ, ठाणे)
  • २१/०४/२०२३ (अंतिम) दिवसाचा उत्कुष्ट चढाईपट्टू : निकिता कदम (शिवतेज क्रीडा मंडळ, ठाणे)
  • २१/०४/२०२३ (अंतिम) दिवसाची उत्कुष्ट पक्कडपट्टू   : सुरेख कदम  (शिवशक्ती क्रीडा मंडळ,धुळे)

पुरुष गट :

  • अंतिम विजेता : स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर
  • अंतिम उपविजेता : उत्कर्ष क्रीडा मंडळ,  मुंबई उपनगर
  • उप उपांत्य विजेता : क्रीडा प्रभोधिनी, नाशिक व उजाला क्रीडा मंडळ, ठाणे
  • स्पर्धेतील सर्वोत्कुष्ट खेळाडू :  अक्षय बर्डे (स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर )
  • स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपट्टू : राकेश हेगडे (उत्कर्ष क्रीडा मंडळ,  मुंबई उपनगर)
  • स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पक्कडपट्टू  : अरकम शेख  (स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर )
  • २०/०४/२०२३ दिवसाचा उत्कुष्ट चढाईपट्टू : मिहीर पाटील (उजाला क्रीडा मंडळ, ठाणे)
  • २०/०४/२०२३दिवसाची उत्कुष्ट पक्कडपट्टू   : अक्षय रासकर (क्रीडा प्रभोधिनी, नाशिक)
  • २१/०४/२०२३ (अंतिम) दिवसाचा उत्कुष्ट चढाईपट्टू : प्रफुल्ल चव्हाण (स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर)
  • २१/०४/२०२३ (अंतिम) दिवसाची उत्कुष्ट पक्कडपट्टू   : नितीन घोगले (उत्कर्ष क्रीडा मंडळ,  मुंबई उपनगर)
टॅग्स :Kabaddiकबड्डी