दीनानाथ परब
मुंबई, दि. ९ - रिओला जा, सेल्फी काढा, रिकाम्या हाताने परत या, हा सर्व पैशांचा अपव्यय आहे या वादग्रस्त टि्वटमधून शोभा डे यांनी आपल्या अपूर्ण ज्ञानाची प्रचिती दिली आहे. ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी खेळाडू काय कष्ट घेतात, किती वर्ष मेहनत घेतात याची डे यांना जराही कल्पना नाही. डे स्वत: प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांनी स्पोटर्सवर लेख लिहीण्यासाठी क्रिकेट व्यतिरिक्त भारतीय क्रीडा क्षेत्राचा अभ्यास करावा त्यावेळी त्यांना सेल्फी काढा, रिकाम्या हाताने परत या शब्दांचा अर्थ समजेल.
ऑलिम्पिकच्या पहिल्या तीन दिवसात भारतीय गोटातून कोणतीही सुखावणारी बातमी न मिळाल्यामुळे देशवासीयांची निराशा झाली आहे हे खर असलं तरी त्यासाठी सर्वस्वी खेळाडूंना जबाबदार धरण चुकीचं आहे.
कारण ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेमध्ये कुठलाही क्रीडापटू आपल्यातील सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी, मेडल जिंकण्यासाठी सहभागी होत असतो. ऑलिम्पिकला किती भारतीय खेळाडूंचे पथक गेले आहे ? ते कुठल्या खेळांमध्ये सहभागी होणार आहे हे शोभा डे यांना ठाऊकही नसेल. आता भारतीय खेळाडूंच्या पराभवाच्या बातम्या येत असल्यामुळे शोभा डे यांना जाग आली आहे.
या खेळाडूंनी ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी काय कष्ट घेतले, किती आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव घेतला, प्रतिकुल परिस्थितीशी झगडताना कुठल्या अडथळयांचा सामना करावा लागला हे शोभा डे यांना माहितही नसेल. फक्त पदक मिळाले नाही म्हणून आता डें चा पारा चढला आहे. आज जे देश पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहेत.
उदहारणार्थ चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया या देशातील क्रीडाक्षेत्रासाठीच्या पायाभूत सोयी-सुविधांची डे यांनी जाऊन पाहणी करावी त्यातुलनेत भारतीय क्रीडापटूंना काय मिळते याचा विचार करावा. आज ऑलिम्पिकपर्यंतची मजल मारणारे भारतीय खेळाडू सामान्य घरातून आले आहेत. आपली खेळाची आवड जपून देशासाठी पदक मिळवण्याच्या त्यांच्या जिद्दीला खरतर डे सारख्या व्यक्तींनी सलाम करायला हवा.
कारण अनेकदा खेळाचा खर्च भागवताना संपूर्ण कुटुंबाची ओढाताण होते. प्रायोजक मिळवण्यासाठी अनेकांचे उंबरे झिजवावे लागतात तेव्हा कुठे ऑलिम्पिकपर्यंत मजल मारता येते. चीन, अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया या देशात असे होत नाही तिथे शालेय जीवनापासून क्रीडा क्षेत्रासाठीच्या उत्तम दर्जाच्या पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. तिथल्या मातीत क्रीडा संस्कृती रुजलेली आहे.
भारतात अशी क्रीडा संस्कृती अजून रुजायची आहे. फक्त ऑलिम्पिक आले कि, आपल्याला पदक दिसतात. आपल्या क्रीडा क्षेत्राच्या दुरावस्थेवर वृत्तवाहिन्यांवर तासतासभर चर्चा होतात. त्याआधी आपण क्रिकेटच्या प्रेमात, क्रिकेटच्या विक्रमात हरवलेलो असतो.
How I wish if there was any mechanism to tax 80% of income tax from ppl like #ShobhaDe & transfer all that money to development of Athletes— Riya Mukherjee (@riyalovezu) August 9, 2016
#ShobhaDe winning a medal in an Olympic event is not that easy as taking a Divorce.— Pradeep Borate (@Rising_Maratha) August 9, 2016
People saying that "#ShobhaDe didn't say anything wrong" are nothing but 'Sho Bhade ke Tattu'.— Mohit Ghune (@Ghunegaar) August 9, 2016