शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

थायलंड ओपन बॅडमिंटन : रंकीरेड्डी-पोनप्पाचा धक्कादायक विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 3:20 AM

थायलंड ओपन बॅडमिंटन : किदाम्बी श्रीकांत दुसऱ्या फेरीत

बँकॉक : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी- अश्विनी पोनप्पा जोडीने थायलंड ओपन बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीत बुधवारी सलामी लढतीत चान पेंग सून - गोह लियू यिंग या आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जोडीवर धक्कादायक मात करीत कारकिर्दीत सर्वांत मोठ्या विजयाची नोंद केली आहे.

भारताच्या या बिगर मानांकित जोडीने एक तास दोन मिनिटे चाललेल्या संघर्षात मलेशियाची सून - यिंग या पाचव्या मानांकित जोडीला २१-१८, १८-२१, २१-१७ ने धूळ चारली. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सून- यिंग यांच्यावर मात करण्याची पोनप्पा- रंकीरेड्डी यांची ही दुसरी वेळ आहे. २३ व्या स्थानावर असलेल्या भारताच्या या जोडीने मागच्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत मलेशियाच्या या जोडीवर मात केली होती.

पोनप्पा-रंकीरेड्डी यांचा सामना आता इंडोनेशियाची जोडी एलफियान एको- मार्शेला इस्लामी यांच्याविरुद्ध होईल. पाचवा मानांकित किदाम्बी श्रीकांत याने चीनचा नवखा खेळाडू रेन पेंग बो याचा कडव्या संघर्षात एक तास सात मिनिटांत २१-१३, १७-२१, २१-१९ ने पराभव केला. श्रीकांतची गाठ थायलंडचा खोसित फेतप्रदाब याच्याविरुद्ध पडेल. सौरभ वर्मा मात्र पहिल्याच सामन्यात पराभूत झाला. त्याने जपानचा प्रतिस्पर्धी कांटा सुनेयामा याच्याकडून २१-२३, २१-१९, ५-२१ असा पराभव पत्करावा लागला.शुभंकर डे याला मात्र पहिल्या सामन्यात अव्वल मानांकित आणि नंबर वन जपानचा केंटो मोमोटो याच्याकडून पुढे चाल मिळाली. महिला एकेरीत साई उत्तेजिता राव ही चीनची जियाओ जिन हिच्यापुढे हतबल ठरली. उत्तेजिताचा १७-२१, ७-२१ ने पराभव झाला.

टॅग्स :BadmintonBadmintonKidambi Srikanthकिदम्बी श्रीकांतThailandथायलंड