मुंबई : दीर्घकाळानंतर पुनरागमन करणारी दोन वेळेची राष्टÑकुल क्रीडा चॅम्पियन पिस्तूल नेमबाज राही सरनोबत हिने आगामी आशियाडमध्ये पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.आशियाड माझ्यासाठी आव्हानात्मक असून मी तयारी चांगली केली असल्याचे सांगून २७ वर्षांची राही म्हणाली, ‘आशियाडसाठी १५ दिवसांचा अवधी आहे. पाठोपाठ कोरियात विश्व चॅम्पियनशिपचेही आयोजन असेल.’ आशियाडमध्ये पदकाची खात्री आहे काय, असे विचारताच ती म्हणाली, ‘विजय तर निश्चित मिळेल. यात काही शंका नाही.’राहीने २०१० च्या नवी दिल्ली आणि २०१४ च्या ग्लासगो राष्टÑकुलच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदके जिंकली आहेत. खांद्याच्या खालच्या भागात (काखेत) जखम झाल्याने तिला वर्षभर खेळास मुकावे लागले होते. तेव्हापासून तिची कामगिरी खालावत गेली. नव्या दमाने उभारी घेण्यास सज्ज झालेली राही म्हणाली, ‘खेळात स्पर्धा अनुभवणे आवडते. भारतीय महिला यासाठी सज्ज असल्याचाआनंद वाटतो. इंचियोन आशियाडची अंतिम फेरी गाठून कांस्य जिंकले होते. यंदा याहून सरस कामगिरी करण्यास मी सज्ज आहे.’ (वृत्तसंस्था)नेमबाजी माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. २०१६ मध्ये जखमेमुळे वर्षभर नेमबाजीस मुकले. २०१७ पासून हवे तसे यश मिळू शकले नाही.- राही सरनोबत
आशियाडमध्ये पदक जिंकणारच!;नेमबाज राही सरनोबतचे ‘टार्गेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 4:41 AM