शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

आशियाई स्पर्धेसाठी नेमबाज सज्ज

By admin | Published: September 24, 2015 11:45 PM

येथील डॉ. कर्णसिंग शूटिंग रेंजवर २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या आशियाई एअर गन चॅम्पियनशिपसाठी भारतीय नेमबाज सज्ज आहेत.

नवी दिल्ली : येथील डॉ. कर्णसिंग शूटिंग रेंजवर २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या आशियाई एअर गन चॅम्पियनशिपसाठी भारतीय नेमबाज सज्ज आहेत. आॅलिम्पिक कोटा मिळविण्यासाठी धडपडत असलेल्या भारतीयांसाठी ही स्पर्धा मोलाची ठरेल, असे मत स्टार नेमबाज अभिनव बिंद्रा, जितू रॉय अणि भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रानिंदरसिंग यांनी गुरुवारी व्यक्त केले.रानिंदर म्हणाले, ‘‘या स्पर्धेचे आयोजन भारतीय आणि आशियाई नेमबाजीसाठी मोलाचे आहे. २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेनंतर भारतात आयोजित होणारी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल.’’भारताने रिओ आॅलिम्पिकसाठी आतापर्यंत ८ कोटे मिळविले आहेत. लंडन आॅलिम्पिकमधील कामगिरीमुळे भारताला आॅलिम्पिकमध्ये ११ पर्यंत कोटा मिळविण्याची संधी असेल. चार दिवसांच्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत १४ देशांमधील १८० नेमबाज सहभागी होतील. यजमान भारताचे ५६ नेमबाज सिनियर, युवा आणि ज्युनियर गटात सहभागी होतील. पाक आणि चीनमध्ये आॅलिम्पिकसाठी चाचणी स्पर्धेचे आयोजन सुरू असल्याने दोन्ही देश या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत, असे रानिंदरसिंग यांनी सांगितले. जितू राय याला या स्पर्धेद्वारे अधिक अनुभव मिळवायचाय, तर चैनसिंग याच्यासाठी आशियाई स्पर्धा तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहील. बिंद्राशिवाय आॅलिम्पिक कोटा मिळविणारे नेमबाज आणि आॅलिम्पिक कांस्यविजेता गगन नारंग, पिस्तुल नेमबाज जितू रॉय, गुरप्रीतसिंग, प्रकाश नांजप्पा, चैनसिंग तसेच अपूर्वी चंदेला हे स्पर्धेत आव्हान सादर करणार आहेत. चंदेला म्हणाली, ‘‘ही स्पर्धा आॅलिम्पिक तयारीचा भाग आहे. मी रायफलसह काही वस्तू बदलून घेतल्या. ही स्पर्धा भारताच्या यजमानपदाखाली होत असल्याने येथे खेळणे अभिमानास्पद आहे.’’ पिस्तुल नेमबाज श्वेता सिंग म्हणाली, ‘‘मला या स्पर्धेत आत्मविश्वास उंचावण्यासाठी पदक जिंकायचे आहे.’’ एका प्रसिद्ध शॉटगन नेमबाजाविरुद्ध अन्य एका महिला नेमबाजाच्या आईने रायफल संघाकडे गंभीर तक्रार केली. याबाबत विचारताच रानिंदर म्हणाले, ‘‘हा दोन्ही खेळाडूंमधील वाद आहे. हा वाद आम्ही अ‍ॅथलिट आयोगाकडे सोपविला असून, सावधपणा बाळगला जात आहे. या प्रकारात कुणालाही पाठीशी घालायचे नाही, असे आमचे धोरण आहे.’’ (वृत्तसंस्था)रिओच्या तयारीसाठी ही चांगली संंधी असेल. भविष्यातील तयारीसाठी हे महत्त्वाचे आहे. यासाठी दररोज सराव करीत असून, रेंजवर घाम गाळत आहे. भारताने सलग तीन आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याने आमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंची उणीव नाही, याची खात्री पटली.- अभिनव बिंद्रा