शुटिंग बॉल स्पर्धा आजपासून
By admin | Published: December 19, 2014 10:57 PM
हिंगणघाट येथे विदर्भ अजिंक्यपद
हिंगणघाट येथे विदर्भ अजिंक्यपद शुटिंग बॉल स्पर्धा आजपासूननागपूर : ३३ व्या विदर्भ अजिंक्यपद पुरुष व महिला गटाच्या शुटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन हिंगणघाट येथे उद्या २० आणि २१ डिसेंबर रोजी होत आहे. वर्धा जिल्हा शुटिंग बॉल असोसिएशन आणि चेतना स्पोर्टिंग क्लबच्या संयुक्त विद्यमाने जीबीएमएम हायस्कूल हिंंगणघाट येथील प्रांगणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. स्पर्धेत सिनियर गट, ज्युनियर आणि सब ज्युनियर मुले तसेच मुलींच्या गटात सामने खेळविले जातील. या स्पर्धेचे उद्घाटन उद्या दुपारी ३ वाजता हिंगणघाटचे नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे हे करतील. यावेळी तहसीलदार दीपक कारंडे, ॲड. सुधीर कोठारी, जीबीएमएमच्या प्राचार्य लतिका बेलेकर, विदर्भ शुटिंग बॉल संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि सचिव गुलाब राठोड यांची उपस्थिती राहील. या स्पर्धेत विदर्भातील सर्व ११ जिल्हा संघांचा समावेश राहणार असून विजेत्या , उपविजेत्या तसेच तिसरे स्थान पटकविणाऱ्या संघांना स्व. दामोदरराव भुते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती वर्धा जिल्हा संघटनेचे सचिव विनोद भुते यांनी एका पत्रकाद्वारे दिली.