नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत ( ISSF World Cup 2021 ) भारतीय महिला नेमबाजांनी २५ मीटर पिस्तुल प्रकारात वर्चस्व गाजवले. भारतीय महिला नेमबाजांनी सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकावर नाव कोरलं. चिंकी यादवनं सुवर्णपदक पटकावताना महाराष्ट्राच्या राही सरनोबतला ( Rahi Sarnobat ) रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. मनू भाकेरनं कांस्यपदक जिंकले. भारतानं या स्पर्धेत ९ सुवर्ण, ५ रौप्य व ५ कांस्यपदक जिंकली आहेत.
नेमबाजीमधील २५ मीटर पिस्तुल प्रकारात राही ही एकमेव आघाडीची नेमबाजपटू आहे. यापुर्वी २००८ साली युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिने २५ मीटर पिस्तल प्रकारात प्रथम सुवर्ण पदक पटकाविले. त्यानंतर तिने २०१० साली नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण पदकांची कामगिरी केली. २०११ साली आशियाई स्पर्धेत तिने कास्य पदकाची कमाई करीत लंडन ऑलिम्पिकचे दारही आपल्यासाठी खोलले. ग्लासगो येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकाविले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महीला ठरली. यानंतर चॅगवॉन येथे आयएफएस विश्व नेमबाजी स्पर्धेतही सुवर्ण पदक पटकाविले.
ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिनेही सुवर्ण पदक, तर इचीऑनमध्ये २०१४ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत याच प्रकारात तिने कांस्य पदक पटकाविले. २२ ऑगस्ट २०१८ साली जाकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत २५ मीटर नेमबाजीमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारी व महिलांमध्ये पहिली भारतीय ठरली होती. तिच्या या कामगिरीची दखल घेत तिला अर्जुन पुरस्कारानं