कुचिंग : जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारी भारताची पी.व्ही. सिंधू आणि अजय जयराम यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून २० हजार डॉलर्स रोख पुरस्काराच्या मलेशिया मास्टर्स ग्रांपी गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता परुपल्ली कश्यप आणि साई प्रणितला पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीत पी.व्ही. सिंधूने पाचवी मानांकित थाईलंडची पोर्नटिप बुरानाप्रासर्तसुकला ३७ मिनिटांत २३-२१, २१-९ गुणांनी पराभूत अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना चौथी मानांकित जापानच्या नोजोमी ओकूहाराविरुद्द होईल. पुरुष एकेरीत जयरामने एका दिवसात उपउपांत्यपूर्व व उपांत्यपूर्व फेरीत विजय नोंदवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपउपांत्यपूर्व फेरीत जयरामने आदित्य प्रकाशला २१-६, १७-२१, २१-१४ तर उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या हॅरेन लियूला ५६ मिनिटांत २१-१६, २१-२३, २१-८ गुणांनी पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत तिसरे मानांकन असलेल्या भारताचा पी. कश्यपला मात्र सिंगापूरच्या जी लियांग डॅरेक वोंगने ५४ मिनिटांत २१-१३, १७-२१, १३-२१ असे नमविले. (वृत्तसंस्था)
सिंधू, जयराम उपांत्य फेरीत
By admin | Published: January 17, 2015 3:09 AM