शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

सिंधूने इतिहास घडवला, रौप्य पदक पटकावलं

By admin | Published: August 19, 2016 9:01 PM

भारतासाठी प्रथचं रौप्य पदक पटकावण्याचा पराक्रम तिने केला आहे. दबावात उत्कृष्ट प्रदर्षण करताना स्पेनच्या अग्रमांनाकित कॅरोलिना मारिन चांगलेचं झुंजवले.

आॅलिम्पिकमध्ये पटकावले रौप्यपदक : स्पेनची कॅरोलिना मारिन ठरली सुवर्णपदकाची मानकरी

ऑनलाइन लोकमतरिओ, दि. १९ : आशा निराशेच्या हिंदोळ्यावर अतिशय चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने भारताच्या पी. व्ही. सिंधूला १९-२१, २१-१२, २१-१५ असे हरवून २0१६ रिओ आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटनचे सुवर्णपदक जिंकले. आॅलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली बॅडमिंटनपटू बनण्याचा बहुमान मिळवणारी सिंधू रौप्यपदकाची मानकरी ठरली. 

सिंधूने पिछाडीवरुन येवून पहिला गेम जिंकल्यामुळे भारतीय चाहत्यांची सुवर्णपदकाची आस आणखीनच तीव्र बनली परंतु वर्ल्ड चॅम्पियन मारिनने आपला सर्व अनुभव पणाला लावून दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये सिंधूला मात दिली. अंतिम सामन्यात पराभूत झाली असली तरी सिंधूने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करुन सव्वाशे कोटी भारतीयांची मने मात्र जिंकली आहेत. जपानच्या नोजोमी ओकुहारा हिला कांस्यपदक मिळाले. उपांत्य सामन्यात सिंधूने ओकुहारा हिला तर कॅरोलिना मारिनने गत चॅम्पियन चीनच्या ली जुईरुईचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.पहिल्या सेटमध्ये सिंधूची पिछाडीवरुन आघाडीकाल, शुक्रवारी झालेल्या सामन्यात पहिल्या गेममध्ये मारिनने आक्रमक खेळाने सुरवात केली. तिने पहिल्या पॉर्इंटपासूनच आघाडी घेतली. सिंधूने तिला गाठण्याचा खूपवेळा प्रयत्न केला, परंतु जोरदार स्मॅश लगावत मारिन पुढेच जात होती. सिंधू १६ पॉर्इंटवर असताना मारिन गेम पॉइंटपासून केवळ दोन पॉर्इंट मागे म्हणजे १९ गुणांवर होती. पण यानंतर सिंधू सुसाट सुटली. तिने सलग पाच गुण घेत २१-१९ असा गेम जिंकला. पहिला गेम जिंकल्यानंतर भारतीय चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले होते. गेम जिंकला असला तरी सिंधूने यामध्ये काही चुकाही केल्या शिवाय तिचे एक रेफरल वाया गेले.दुसऱ्या गेममध्ये मारिनचे पुनरागमनपहिल्या गेममध्ये अचानक झालेल्या आक्रमणामुळे गोंधळून गेलेल्या मारिनने दुसऱ्या गेममध्ये आपल्या रणनितीत बदल केला. स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत तिने आपली आघाडी वाढवण्याकडे लक्ष दिले. सिंधूला फोरहँड, बॅकहँडच्या जोरदार फटक्यांनी जेरीस आणीत मारिनने हा सेट २१-१२ असा सहज जिंकला. निर्णायक तिसरा गेमसामन्यात बरोबरी साधल्याने उत्साहीत झालेल्या मारिनने तिसऱ्या आणि निर्णायक सेटची सुरवातही आक्रमक केली. मारिनने पाच पॉईंटची कमाई केली त्यावेळी सिंधूचा एक पॉईंट झाला होता. पण सिंधूने दबाव न घेता ही आघाडी कमी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले. तिच्या या प्रयत्नांना दहाव्या पॉर्इंटवर बरोबरी साधली. पण यानंतर सिंधूने सलग चार पॉईंट गमावल्याने मारिनने १४-१0 अशी आघाडी साधली. अकराव्या पॉर्इंटच्यावेळी मारिनचा पाय मुरगळाला पण तिने लगेच सामन्यात पुनरागमन केले. यानंतर तिने सिंधूला फारशी संधी न देता २१-१५ अशी विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना १ तास २३ मिनिटे चालला.भारताचे चौथे रौप्यपदकसिंधूने आज मिळवलेले रौप्यपदक हे भारताचे आॅलिम्पिक इतिहासातील एकूण चौथे वैयक्तिक रौप्यपदक आहे. यापूर्वी नेमाबाज राज्यवर्धनसिंग राठोड (अथेन्स २00४), विजयकुमार (लंडन २0१२) आणि मल्ल सुशीलकुमार (लंडन २0१२) यांनी तीन रौप्यपदके देशाला मिळवून दिली आहेत.आॅलिम्पिक पदक विजेती पाचवी महिलासिंधू आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पाचवी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी कर्नाम मल्लेश्वरी, मेरिकोम, सायना नेहवाल आणि साक्षी मलिक यांनी आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत. पण सिंधूने यापुढे जात रौप्यपदकाची कमाई केली.