शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

जपान ओपनमधून सिंधूची माघार

By admin | Published: September 15, 2016 11:30 PM

रिओ आॅलिम्पिकची रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने पुढील आठवड्यात प्रारंभ होत असलेल्या जपान ओपन सुपर सिरिज स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकची रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने पुढील आठवड्यात प्रारंभ होत असलेल्या जपान ओपन सुपर सिरिज स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीने भारताला पदक पटकावून देणाऱ्या स्टार बॅडमिंटनपटूने त्याचसोबत २७ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या कोरिया सुपर सिरीज स्पर्धेतूनही नाव वापस घेतले आहे. त्यानंतर पुढील महिन्यात १८ आॅक्टोबरपासून ओडेंसेमध्ये खेळल्या जाणाऱ्या डेन्मार्क ओपन सुपर सिरिजमध्ये तिच्या पुनरागमनाची आशा आहे. २१ वर्षीय सिंधू जर जपान ओपन स्पर्धेत सहभागी झाली असती तर रिओतील सुवर्णपदक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनविरुद्ध तिची उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडण्याची शक्यता होती. राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद म्हणाले,‘सिंधू टोकि योमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणार नाही. डेन्मार्क ओपन स्पर्धेत ती पुनरागमन करेल. ती पुढील महिन्यात होणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेतही सहभागी होणार नाही. आम्ही तिच्या कार्यक्रमामध्ये काही बदल केलेले आहेत.’गेल्या वर्षी सिंधूने डेन्मार्क ओपन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी तिला चीनच्या ली जुईरुईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. सिंधूने विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्यपदकाचा मान मिळवला आहे तर ग्रांप्रीमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले आहे. मात्र तिला अद्याप सुपर सिरिजमध्ये जेतेपद पटकावता आलेले नाही. रिओमधील यशानंतर तिने सुपर सिरिज स्पर्धेत चमकदार कामगिरीचा विश्वास व्यक्त केला आहे. आॅक्टोबर महिन्यात डेन्मार्क ओपन स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेली सिंधू चायना ओपन व हाँगकाँग ओपन स्पर्धेतही सहभागी होणार आहे. या स्पर्धेत तिची कामगिरी उल्लेखनीय ठरली तर डिसेंबर महिन्यात दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या सुपर सिरिज फायनलसाठी ती पात्र ठरेल. यापूर्वी केवळ सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत हे भारतीय बॅडमिंटनपटू या स्पर्धेत खेळले आहेत. सिंधूचे प्रशिक्षक म्हणाले,‘रिओ आॅलिम्पिकनंतर सिंधूकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. प्रतिस्पर्धी खेळाडू तिला पराभूत करण्यासाठी तयारी करीत आहेत.’सिंधूच्या अनुपस्थितीत श्रीकांत भारताचे आव्हान सांभाळणार आहे. पुरुष एकेरीमध्ये सहभागी होणाऱ्या अन्य भारतीय खेळाडूंमध्ये अजय जयराम, बी. साई प्रणीत आणि एच.एस. प्रणय यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)