शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

सिंधू, श्रीकांत यांचे विजयी अभियान सुरू

By admin | Published: January 26, 2017 1:11 AM

रिओ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने अनुरा प्रभुदेसाई आणि गतविजेत्या किदाम्बी श्रीकांतने लखानी सारंगचा अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीत पराभव करीत

लखनौ : रिओ आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने अनुरा प्रभुदेसाई आणि गतविजेत्या किदाम्बी श्रीकांतने लखानी सारंगचा अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीत पराभव करीत १२० हजार डॉलर रकमेच्या सय्यद मोदी ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधूने आपल्याच देशाच्या प्रभूदेसाईला सरळ दोन सेटमध्ये २१-९, २१-११ असे पराभूत केले. तिसऱ्या मानांकित श्रीकांतने गुडघ्यातील दुखापतीनंतर पुनरागमन केले. त्याने पहिल्याच सामन्यात लखानीचा २५-२१, २१-७ आणि २१-१४ ने पराभव केला. आता त्याचा सामना मलेशियाच्या जुल्हेल्मी जुल्कीफ्ली याच्याविरुद्ध होईल. जुल्हेल्मीने सचिन रावतचा पराभव केला आहे. २०१६ चा स्विस ओपनचा विजेता असलेल्या प्रणयने एनवीएस विजेत्याचा २१-११, २१-९ ने पराभव केला. नवव्या मानांकित प्रणिथने आदित्य जोशीला २१-१४, २१-९ ने पराभूत केले. चिनी ताईपेचा चॅम्पियन ११व्या मानांकित सौरभने राहुल यादव चित्ताबोईनाचा २१-११, २१-१७ ने पराभव केला. जगातील १५वा मानांकित डेन्मार्कचा हंस क्रिस्टियन विटिंगघसने भारताच्या मुनावर मोहम्मदचा २१-११, २१-१३ ने पराभव केला. महिला गटात, पॉलिश ओपनची विजेती रितुपर्णा दासने नेपाळच्या नांगसाल तमांगचा २१-५, २१-६ ने पराभव केला.(वृत्तसंस्था)