मुंबई : सुपर मॉम एमसी मेरी कोमचीमुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे. 20 जानेवारीला 16वी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. मेरी कोमने 2003, 2006, 2009 आणि 2013 मध्ये अनुक्रमे अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. तिने सहा वेळा जगज्जेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
लाईट फ्लायवेट गटात मेरीने एआयबीबीएच्या मानांकनाच्या क्रमवारीत पहिले स्थान मिळवले होते. याशिवाय 2014 मध्ये दक्षिण कोरियातील इंचॉन येथे झालेल्या एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरण्याचा बहुमान मेरीने संपादन केला आहे. याच यशाची पुरावृत्ती मेरीने 2018 मधील राष्ट्रकुल क्रीडा सापर्धेतही केली होती. 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरविलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर होती. या ऑलिम्पिकमध्ये मेरीने फ्लायवेट (51 किलो गट) लढतीत कांस्यपदक मिळवले होते. 2016 मध्ये भारताचे सन्मानीय राष्ट्रपती यांनी मेरीची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात, राज्यसभेकरता मेरीची खासदार म्हणून नियुक्ती केली होती.
मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत म्हणून नेमणूक झाल्याबद्दल कोम म्हणाली, मुंबई मॅरेथॉनने धावण्याच्या स्पर्धामध्ये देशात क्रांती घडवली आहे. मानवी शक्तीची सर्वोत्तम कामगिरी घडवणारी देशातील सर्वात मोठे व्यासपीठ आहे. मुंबई मॅरेथॉनची सदिच्छा दूत झाल्याबद्दल मला आनंद आहे.''