शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग प्रथम, मुंबई द्वितीय तर सांगलीचा तृतीय क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 4:59 PM

क्लॅप स्केटिंग असोसिएशन आॅफ सिंधुदुर्ग व क्लॅप स्केटिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील जामसंडे येथील इंद्रप्रस्थ सभागृहात आयोजित राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्गच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला.

कणकवली : क्लॅप स्केटिंग असोसिएशन आॅफ सिंधुदुर्ग व क्लॅप स्केटिंग असोसिएशन आॅफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यातील जामसंडे येथील इंद्रप्रस्थ सभागृहात आयोजित राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सिंधुदुर्गच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला. मुंबईला द्वितीय, तर सांगलीला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.१२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर, सांगली, मिरज, मुंबई, सोलापूर या ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते. सुमारे १४० मुले सहभागी झाली होती. देवगडच्या नगराध्यक्षा प्रियंका साळसकर, जिल्हा परिषद सदस्या सावी लोके, बँक आॅफ इंडियाचे कणकवलीचे व्यवस्थापक किशोरकुमार जाधव यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला.६ वर्षांखालील मुलांमध्ये यश सावंत (सुवर्ण), मिहीर सावंत (सुवर्ण), पियूश पंडित (रौप्य),साहीश भगत (रौप्य), विनीत माणगावकर (रौप्य), दिव्यांक कोरगावकर (रौप्य). ६ वर्षाखालील मुलींमध्ये सुमन माणगावकर (सुवर्ण), वृंदा साटम (सुवर्ण), कस्तुरी कांबळे (रौप्य), ओवी गायकवाड (रौप्य). ८ वर्षाखालील मुलांमध्ये अक्षय खडपकर (सुवर्ण), निरज कांबळे (सुवर्ण) साहील पडालकर (सुवर्ण) उत्कर्ष पारधी (रौप्य), प्रथमेश परब (रौप्य),नील ढेकणे (रौप्य), ओम परब (रौप्य), शुएरूत नानल (कांस्य), निशाद माणगावकर (कांस्य), श्रीराम राणे (कांस्य). ८ वर्षाखालील मुलींमध्ये पियुशा मालाडकर (सुवर्ण) विदिता तोरस्कर (सुवर्ण), क्रिशाला तोरस्कर (रौप्य), एनजल प्रभू (रौप्य), श्रेया पराडकर ( रौप्य).लावण्य आळवेला सुवर्णपदक१० वर्षांखालील मुलांमध्ये लावण्य आळवे (सुवर्ण), उत्कर्ष डिचोलकर (सुवर्ण), निहार सावंत (सुवर्ण), रुद्राक्ष भुकम (सुवर्ण), सोहम लाड (सुवर्ण), सुमित सावंत (सुवर्ण), मिहीर शकरदास (रौप्य), शुभम जोशी (रौप्य), अवनीश पंडित (रौप्य), अयुश जाधव (रौप्य), ध्यैर्यशील सापळे (रौप्य), रूग्वेद पिळकर (कांस्य), तन्मय जाधव (कांस्य), १० वर्षाखालील मुलींमध्ये हर्षादा पाव (सुवर्ण), सानिका भगत (सुवर्ण), १२ वर्षाखालील मुलगे- तपन नार्वेकर, धनराज खेटलेकर, आयुश कानेकर, कैशल जाधव, सार्थक खानोलकर, वरूण जाधव, ऋतिज गावकर (सर्वांना सुवर्ण), गोविंद माळी, अनिश सावंत, अथर्व करंगुटकर(रौप्य), १४ वर्षाखालील मुली-उजमा शेख, प्रिजल गवस, भार्गवी परब(सर्व रौप्य), १६ वर्षाखालील मुले-निमीश लोके, आमीन शेख, आदर्श जोशी, मंथन शंकरदास (सर्व सुवर्ण), तन्मय गावडे, ओम आळवे, सौरभ्य धोनुकसे, सौरभ मोरजकर यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.डिसेंबरमध्ये बनारस येथे होणा-या राष्ट्रीय क्लॅप स्केटिंग स्पर्धेसाठी निवडचाचणीही घेण्यात आली. महाराष्ट्र क्लॅप स्केटिंग असोसिएशनचे सचिव सुशांत चव्हाण व राष्ट्रीय क्लॅप स्केटिंग असोसिएशनचे सचिव अजित चव्हाण, क्लॅप स्केटिंग असोसिएशनचे सचिव योगेश सामंत, प्रशिक्षक वैभव सर्पे, प्रेरणा आळवे, श्रध्दा सावंत यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले. विजेत्या स्पर्धकांसह महाराष्ट्र क्लॅप स्केटिंग असोसिएशनचे सचिव सुशांत चव्हाण व राष्ट्रीय क्लॅप स्केटिंग असोसिएशनचे सचिव अजित चव्हाण, क्लॅप स्केटिंग असोसिएशनचे सचिव योगेश सामंत, प्रशिक्षक वैभव सर्पे, प्रेरणा आळवे, श्रध्दा सावंत आदी उपस्थित होते.